Categories: Uncategorized

वडगावचे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा प्रतिनिधी 
वडगाव दक्षिण व उत्तर ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर आज जेऊर तालुका करमाळा येथे आमदार कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी नूतन सरपंच चंद्रकांत रामचंद्र काळे यांचा सत्कार केला यावेळी संचालक व माजी पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट राहुल सावंत ,संचालक देवानंद बागल,माजी सभापती गहिनीनाथ ननावरे,संचालक राजाभाऊ कदम,माजी सरपंच गणेश अंधारे,माजी सदस्य सुदाम काळे पाटील गटाचे मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुनराव सरक सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वडगाव दक्षिण उत्तर ग्रामपंचायतीस माझे पूर्ण सहकार्य राहणार असून या गावातील नागरिकांच्या रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी शासनाकडून विविध माध्यमातून निधी मिळवून दिला जाईल तसेच या परिसरातील मांगीतलावाचा समावेश कुकडे प्रकल्पात करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार तसेच नियोजित रीटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनीचे ओव्हर फ्लो पाणी मांगीतलावात सोडण्यासाठी ही शासनाकडे आपण आग्रही आहोत वडगाव दक्षिण उत्तर व परिसरातून विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार नारायण आबा पाटील यांनी दिले उपस्थिताचे आभार राहुल गोडगे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

1 day ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago