—
करमाळा प्रतिनिधी 22 जून रोजी बार्शी येथे आयोजित केलेल्या मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन सामान्यज्ञान परीक्षेत नगरपालिका प्राथमिक मुलांची शाळा क्र. 2 करमाळा मधील राजवीर श्रीमंत हांगे याने इयत्ता दुसरीच्या गटात राज्यातून पाचवा क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.
या गौरवप्रसंगी झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच न.प. शिक्षण मंडळ कुर्डूवाडी व करमाळा येथील आदरणीय प्रशासन अधिकारी श्री. अनिलजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते राजवीर यास सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र जायभाय व वर्ग शिक्षक श्रीअशोक ढाकणे, श्री संदीप घाडगे शिक्षकांनीही राजवीरच्या या यशाचे कौतुक केले असून, भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाने शाळेतील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असा विश्वास मुख्याध्यापकांनी श्री राजेंद्र जायभाय यांनी व्यक्त केला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय अकबर सय्यद व शाळा व्यवस्थापन समितीचे तीचे सर्व सदस्य यांनी राजवीर हांगे यांचे अभिनंदन केले.
करमाळा, प्रतिनिधी दि. १५ जून : अनेक दिवसांपासून बंद असलेली करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावरील एसटी बससेवा सोमवारपासून…
करमाळा प्रतिनिधी निंभोरे, ता. करमाळा : जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि शासकीय शिक्षणाला…
" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुनं रोजी आधार मेळावा आयोजित केला असुन नागरिकांनी…
करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा, ता. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करमाळा नगरपरिषदेच्या वतीने महावीर उद्यान…