Categories: करमाळा

करमाळा बाजार समितीस विक्रमी १ कोटी ११ लाख रूपये वाढावा रस्ते काँक्रिटीकरणाची कामे प्रगतीपथावर -माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे इतिहासात प्रथमच विक्रमी असा १ कोटी ११ लाख रुपये वाढावा झाला असून बाजार समितीने कोणत्याही वित्तीय संस्थेचे अथवा बँकेचे कर्ज न घेता स्वनिधीतून रस्ते काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली असून पहिल्या टप्प्यातील पूर्व यार्ड मधील रस्ते काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती तथा करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली .याविषयी अधिक माहिती देताना माजी आमदार जगताप यांनी सांगितले की,करमाळा बाजार समितीला सन २०२४ -२५ मध्ये २ कोटी साठ ६० रुपये उत्पन्न होऊन बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच खर्च वजा जाता विक्रमी असा तब्बल १ कोटी ११ लाख रुपये वाढावा म्हणजेच नफा झालेला आहे .काटकसरीने व अत्यंत पारदर्शक कारभार केल्यामुळेच अडीच कोटी उत्पन्नात जवळपास सव्वा कोटी रुपये वाढावा होणारी करमाळा मार्केट कमिटी राज्यात एकमेव असल्याचा दावा देखील यावेळी जगताप यांनी केला .पदाधिकारी,शेतकरी ,व्यापारी, हमाल -तोलार व कर्मचारी या सर्वांच्या समन्वयातून करमाळा मार्केट कमिटीचा एक विश्वसनीय बाजारपेठ म्हणून नावलौकिक असल्यामुळे फक्त तालुक्यातीलच नव्हे तर आसपासचे जिल्ह्यातील देखील भुसार माल मोठ्या प्रमाणात करमाळा मार्केट यार्ड मध्ये विक्रीस येतो .शेतकऱ्यांसमक्ष उघड लिलाव व त्वरीत पट्टी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा करमाळा बाजारपेठेवर पूर्ण विश्वास आहे .या सर्व घटकांच्या विश्वासाच्या बळावरच मी १९८९ साली बाजार समितीची सूत्रे हाती घेतले पासून बाजार समिती मधे शॉपिंग सेंटर ,गोदामे, सेल हॉल ,भाजी मंडई, कॅटल मार्केट , रयत भवन ,धान्य चाळणी यंत्र उभारणी सह रस्ते ,वीज ,पाणी या सर्व पायाभूत सुविधा देण्यात यशस्वी झालो असल्याचे देखील जगताप यांनी आवर्जून सांगितले .भविष्यात करमाळा येथे उर्वरित भागातील रस्ते कॉंक्रिटीकरणासह जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करणे यासह जेऊर उपबाजार आवार येथे नवीन विकास आराखडा तयार करून करमाळ्याच्या धर्तीवर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्मितीच्या उद्देशाने जेऊर येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचे माजी आमदार जगताप यांनी सांगितले .

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

1 hour ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

7 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago