Categories: करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी आरोपीचे ताब्यातुन 7,20,000/-रुपये किंमतीच्या 12 मोटारसायकल हस्तगत

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी आरोपीचे ताब्यातुन 7,20,000/-रुपये किंमतीच्या 12 मोटारसायकल हस्तगत करण्यात आले आहे.करमाळा पोलीस ठाणेची हद्द मोठी असल्याने, तसेच करमाळा पोलीस ठाणेचे हद्दीलगत अहिल्यानगर, धाराशिव, पूणे हे जिल्हे येत असल्याने करमाळा पोलीस ठाणेचे हद्दीत चोरीचे प्रमाण जास्त आहे. तसेच पोलीस ठाणे हद्दीमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमरेचे प्रमाण कमी असल्याचा फायदा घेऊन पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. परंतू मोटारसायकल चोरांपर्यत पोहचण्यास अद्याप यश आलेले नव्हते. त्यामुळे मोटारसायकल चोर पकडणेसाठी वेगवेगळी पथके तयार करूनमोटासायकल चोरांचा शोध घेत होतो. त्यात देखील यश येत नसल्याने मोटारसायकल चोरी हे एक पोलीसासमोर मोठे आव्हान होते,
घटना क्र.01
दिनांक 25/06/2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली की, निलेश भास्कर कदम रा. घाटणे ता. माढा जि. सोलापुर हा इसम करमाळा पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकलची चोरी करत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने रवाना पथकामार्फत शोध चालु केला असता तो ऑलआउट कोंबींग दरम्यान मिळून आल्याने त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव निलेश भास्कर कदम वय 26 वर्षे रा. घाटणे ता. माढा जि. सोलापुर असे असल्याचे सांगितले, त्याला त्यांचे जवळ असणारे मोटारसायकल बाबत चौकशी करून पोलीस अभिलेख तपासणी केली असता सदरची हिरो होन्डा स्प्लेडर मोटारसायकल करमाळा पोलीस ठाणे गु.र, नं 502/2025भा. न्य.सं 303(2) प्रमाणे मधील असल्याचे व ती मौजेअंजनडोह, ता करमाळा येथुन चोरल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सदर गुन्हयात अटक करण्यात आली.
सदर आरोपीस अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केले असता त्याने करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील देवीचा माळ, जेऊर, कंदर, वडशिवणे तसेच टेंभुर्णी पोलीस ठाणे जि सोलापुर, परांडा पोलीस ठाणे जि. धाराशिव या भागातुन ।। मोटारसायकल चोरल्याची कबुली दिल्याने त्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
घटना क्र. 02दिनांक 25/06/2025 रोजी करमाळा पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि नं. 523/2025 कलम ३०३ (२) गुन्हामधील मोटारसायकलचा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार शोध घेत असताना एक इसम आपल्या कडील हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी अति भरधाव वेगाने सालसे कुर्दुवाडी रोडकडे जात असताना त्यावेळी त्या इसमाचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करून पकडले असता त्याला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव पृथ्वीराज उर्फ गोट्‌या कांतीलाल काळे वय 27 वर्षे रा. नेलें ता. करमाळा जि. सोलापुर असे असल्याचे सांगितले, त्याला त्यांचे जवळ असणारे मोटारसायकल बाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे देवू लागला त्याला विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने नेलें, ता करमाळा येथील हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याला सदर गुन्हयात अटक करण्यात आली.तपासादरम्यान खालील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघकिस आले आहेत —-

1) करमाळा पोलीस ठाणे कड़ील गुन्हा रजि नं.500/2025, भा. न्य. से 30.3(2) प्रमाणे

2) करमाळा पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि नं. 502/2025 भा.न्य.सं 303(2) प्रमाणे

3) करमाळा पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि नं. 514/2025 भा.न्य.सं 303(2) प्रमाणे

4) करमाळा पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि नं. 516/2025 भा.न्य.सं 303(2) प्रमाणे

5) करमाळा पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि नं. 522/2025 भा.न्य.सं 303(2) प्रमाणे

6 करमाळा पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि नं. 523/2025 भा.न्य.सं 303(2) प्रमाणे

7) टेंभुर्णी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. 184/2025 भा.न्य.सं 303(2) प्रमाणे

8) परांडा पोलीस ठाणे जि धाराशिव गुन्हा रजि. 214/2022 भा.द.वि. 379 प्रमाणे

१) एक हिरो होन्डा स्प्लेंडर काळ्या रंगाचीमो.सा. तीचाचेसी नं. MBL.HA10ALCHE 69514 इंजिन नं-HAIDEJCHE75334 असा असलेली.10) एक हिरो होन्डा स्प्लेंडर काळ्या रंगाचीमो.सा. तीचाचेसी नं00H20F21044, इंजिन नं 00H18E21000 असा असलेली.

11) एक हिरो होन्डा स्प्लेंडर काळ्या रंगाची, मो.सा. तीचाचेसी नं. 02M20F17950, इंजिन नं 02M18E16075, असा असलेली.12) एक हिरो होन्डा स्प्लेंडर काळ्या रंगाची, मो.सा. तीचाचेसी नं.MBLHA10EE9HK54974, इंजिन नं. HAI0EA9HK4437 असा असलेली.वरीलपैकी 04 मोटारसायकल ची माहीती प्राप्त न झाल्याने सदर मोटारसायकल बाबत मा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलुज व सोलापुर यांना पत्र व्यवहार केला असुन त्याची माहीती प्राप्त होताच आणखीन गुन्हे उघ्रडकिस येण्याची शक्यता आहे.
सदरच्या 12 मोटारसायकल जप्त करून 7,20,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
सदरची कामगिरी मा.श्री. अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, मा. श्री. प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण मा. श्री. अजित पाटील सो।, पोलीस उपअधिक्षक करमाळा विभाग करमाळायांचे मार्गदर्शनाखालीमा, रणजित माने सो, पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदारांनी सपोफी/विश्वास शिनगारे, पोहेकॉ अजित उबाळे, पोहेका आप्पासाहेब लोहार, पोहेकॉ डोंगरे पोना मनिष पवार, ठेंगल, पोनामयुर गव्हाणे पोका राहुल भराटे, पोको अर्जुन गोसावी, पोकॉ स्वप्नील शेरखाने, रविराज गटकुळ, पोकॉ अमोल रंदिल, पोकॉ योगेश येवले, पोकॉ/ मिलीद दहिहांडे, गणेश खोटे पोहेका व्यकंटेश मोरे सायबर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण यांनी केली आहे. सदर गुन्हयाचे पुढील तपास चालु आहे

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

11 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

15 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

21 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

1 day ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

2 days ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago