Categories: Uncategorized

शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधांची वाटप डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी

करमाळा प्रतिनिधी

पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधी वाटपाचा सलग तीन दिवस कार्यक्रम देवळाली येथे शिवसेना तालुका समन्वयक राहुल कानगुडे त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहेया आरोग्य शिबिराचे उद्घाटन
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करून हा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रुग्णांची सेवा केली
प्रत्येक वारकऱ्यांना लागेल ते औषधे मोफत देण्यात आलेया वारकऱ्यांना इंजेक्शन सलाईन ची गरज असेल
वारकऱ्यांना मोफत सलाईन इंजेक्शन देण्याची सोय स्वातंत्र्यसैनिक साथी मनोहर पंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे.डॉक्टर ओंकार उघडे यांनी वारकऱ्यांची आरोग्य सेवा सेवा मोफत सुरू केली आहे.यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की पुढील आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे विठ्ठलाच्या महापूजेला यावे अशी सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे.खऱ्या अर्थाने वारकऱ्यांना मानसन्मान देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहेवारीतील प्रत्येक दिंडीला वीस हजारच्या अनुदान देण्यात आले असून प्रत्येक वारकऱ्यांच्या शक्ती स्थळ भक्ती स्थळ असलेल्या देवस्थानला कोट्यावधी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊन पुढील आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजा येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

9 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago