Categories: करमाळा

करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या स्वागतासाठी रावगाव ग्रामपंचायतीची जय्यत तयारी

करमाळा प्रतिनिधी/

मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आगमन रविवार, दि.२९ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात होणार असून, रावगाव (ता. करमाळा) येथे या पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. रावगाव ग्रामपंचायत व करमाळा तालुका प्रशासनाच्या वतीने या स्वागताची भव्य तयारी करण्यात आली आहे.
या वर्षी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात सुमारे ७० हजार वारकरी, चार अश्व आणि चार बैल सहभागी होणार आहेत. वारकऱ्यांची सोय लक्षात घेता वॉटरप्रूफ मंडप व पत्रा शेड उभारण्यात आले असून, यात सुमारे २५ ते ३० हजार भाविकांना आसन व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

भाविकांसाठी सुविधा:-

• एकूण शौचालय युनिट – २६५
महिलांसाठी– ११५
पुरुषांसाठी– १५०

• एकूण स्नानगृहे – २५०
महिलांसाठी – १००
पुरुषांसाठी – १५०

• आपत्कालीन कक्ष – २
• हिरकणी कक्ष – २
• मोफत मसाज सेवा (पूर्ण शरीर व पायांसाठी) – २ कक्ष

इतर कक्ष:-
• कपड्यांची इस्त्री
• चप्पल दुरुस्ती
• मोबाईल चार्जिंग
• मोफत आरोग्य सुविधाया भव्य तयारीची पाहणी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम, प्रकल्प संचालक ठोंबरे साहेब, गटविकास अधिकारी कदम साहेब, उत्तर सोलापूर गटविकास अधिकारी भोंग साहेब, सोलापूर मनपाचे उपायुक्त लोकरे साहेब, सीआरपी येळवणे साहेब, ग्रामविकास अधिकारी हजारे भाऊसाहेब व माने मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडली.
या स्वागताची तयारी रावगाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून परिश्रमपूर्वक करत आहेत. या पालखी आगमनाने रावगाव गाव भक्तिमय वातावरणात न्हालं जाणार असून, भाविकांसाठी ही एक भक्तीची पर्वणी ठरणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

3 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

9 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago