Categories: करमाळा

समरसता साहित्य परिषद सोलापूरच्या बहुभाषिक कवी संमेलनात श्रोते चिंब

करमाळा प्रतिनिधी 
समरसता साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने कवीसंमेलन
सोलापूर, हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगु, संस्कृत भाषेतील आशयघन आणि अंतर्मुख करायला लावणाऱ्या कवितांनी श्रोते चिंब भिजवून गेले. निमित्त होते समरसता साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृहात आयोजित केलेल्या बहुभाषिक कवी संमेलनाचे.
कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी माधव पवार होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुलकर्णी यांच्यासह समरसता साहित्य परिषदेचे प्रांत सहकार्यवाह सुहास घुमरे, पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षा मानसी चिटणीस, सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. माधव कुलकर्णी, सोलापूरचे कार्यवाह देवेंद्र औटी, प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार, युवक आयाम प्रमुख आनंद धडके, युवती आयाम प्रमुख रूपा कुताटे, युवती सहआयाम प्रमुख श्रद्धा रोडगे, ऐश्वर्या धडके, पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी आदी उपस्थित होते. मान्यवर कवींच्या गझल मुशायराने बहुभाषिक कवीसंमेलनाची सुरुवात झाली एकापेक्षा. एकापेक्षा एक सरस कृती सादर केल्याने सभागृह अंतर्मुख झाले. निलोफर शेख यांच्या सूत्रसंचालनाने रंगत वाढली. माधव पवार यांच्या अर्थगर्भ कविता, गझलाच्या कोटीने फोडणी दिली. यात साबीर सोलापुरी, कालिदास चवडेकर, जीवन धेंडे, निलेश शेंबेकर, विजय खाडे, नवनाथ खरात, प्रिया कौलवार, संजय लांडगे, मुबारक शेख, प्रा. डॉ. धन्यकुमार बिराजदार या गझलकारांनी आपल्या गझला सादर केल्या. प्रकाश गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवीसंमेलनात हरिश्चंद्र पाटील, सोमनाथ टकले, प्रा. दुर्गा जोशी, जयश्री श्रीखंडे, रेणुका बुदारम, देवेंद्र औटी यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन पत्रकार अरविंद मोटे यांनी केले तर आभार सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. माधव कुलकर्णी यांनी मांनले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

16 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago