Categories: करमाळा

करमाळा शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांच्या सहभागाने मोहरम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार -शौकत नालबंद अध्यक्ष मोहरम कमिटी करमाळा

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरांमध्ये हिंदू मुस्लिम बांधवाचे एकात्मतेचे दर्शन घडवणारी सवारी पंजेची स्थापना करून मोहरमचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मोहरम कमटीचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद यांनी दिली. करमाळा शहरामध्ये एकूण 14 सवाऱ्या सहा डोलेची स्थापना होत असून करमाळा शहरामध्ये प्रामुख्याने मानाची सवारीची स्थापना दिनांक 27 जून रोजी किल्ला वेस येथे झाली असून . मंगळवार दिनांक एक जुलै रोजी उर्वरित तेरा सवाऱ्यांची व सहा डोल्याची स्थापना होणार आहे.ईमाम कासम सवारी मोहीद्दीन तालीम पंच जाकीर हाशिम वस्ताद यांची सवारी ,अल्लाउद्दीन सवारी कुंभार वाडा पंच राजेंद्र परदेशी , नाले हैदर सवारी खाटीक गल्ली पंच बिलाल कुरेशी, लालन सवारी भवानी पेठ पंच मोहम्मद शरीफ शेख ,नाले हैदर सवारी मोहल्ला गल्ली पंच हाजी समीर शेख, पाच पंजे मौलाली सवारी पंच शंकर हवालदार ,अल्लाउद्दीन सवारी रंभापुरा पंच बबन दुधाट ,अल्लाउद्दीन सवारी सुमंतनगर पंच दादा अडसूळ, नाले हैदर सवारी खडकपुरा पंच पोपट माहुले, नाले हैदर सवारी मोलाली माळ पंच सलीम मदारी, बारा इमाम सवारी पंच जमाल सय्यद, इमाम सवारी कसाब गल्ली फारुक कुरेशी, इमाम कासम सवारी पंच सलीम मदारी ताजे डौले आघाडीवाला ताज्या पंच तैमुर सय्यद,पांढरी ताजा दिलावर मुलाणी, सुमंतनगर ताजा पंच गणेश जाधव ,खाटीक गल्ली ताजा पंच कासद कुरेशी, गवंडी गल्ली ताजा पंच जाकीर राज, कुंभार वाडा पंच आलमगीर सय्यद, यांच्या वतीने स्थापना होणार असून मोहरम कमिटीच्या उत्सवाच्या मिटींगकरीता हाजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी उपनगराध्यक्ष अहमदचाचा कुरेशी , एडवोकेट नईम काझी, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आझाद भाई शेख, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुकभाई जमादार, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समीर शेख, रहिनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सुरज शेख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सोहेल पठाण, सारंग परदेशी,सागर परदेशी, जिशान कबीर, मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण, भाजप शहर उपाध्यक्ष राजू सय्यद, हाजी उस्मान सय्यद ,जाफर घोडके, इस्माईल सय्यद, सलमान घोडके, शहानुर कुरेशी,अमर शेख, अकबर बेग, अकबर सय्यद जावेद मणेरी फिरोज मणेरी उपस्थित होते. सालाबादप्रमाणे‌ मोहरम‌ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या उत्सवामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे‌ असे आवाहन मोहरम कमिटीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष‌‌ शौकत नालबंद यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago