करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या चालू असून आज सकाळच्या सत्रात करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार नारायण आबा पाटील हे मतदार सघातील महत्वाच्या अशा सीना माढा सिंचन योजनेबाबत सभागृहात लक्षवेधी सूचना मांडणार आहेत.
सदरच्या भुसंपादना साठी ३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. यातील २१ कोटी रुपये निधी तातडीने मिळावा अशी मागणी कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे केली आहे. या योजनेतील १६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सध्या १४ हजार क्षेत्र ओलीताखाली येत आहे. परंतु आजमितीस सुध्दा कुर्डु, पिंपळखुटे, अंबाड ही गावे तसेच माढा मतदार संघातील बावी, तुळशी, परीतेवाडी, अंजनगाव, खेलोवा ही गावे सिंचनापासुन वंचित आहेत.हि गावे ओलीताखाली येऊन या गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटण्यासाठी तृतीय सधारित प्रशासकीय मंजुरी मिळणे गरजेचे असल्याने आज विधानसभेच्या सभागृहात आमदार नारायण आबा पाटील हे आवाज उठवणार असुन आजच्या सकाळच्या सत्रात हा प्रश्न मांडला जाणार आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…