Categories: करमाळा

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शैक्षणिक मदतीसाठी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळयाचा उपक्रम स्तुत्य कौतुकास्पद- प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवंत गरजू विद्यार्थ्यां अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम स्तुत्य कौतुकास्पद असल्याचे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. कमलादेवी औद्योगिक वसाहत करमाळा येथील संतोष कुलकर्णी यांच्या निवासस्थानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला नाशिक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधर कुलकर्णी, फलटणचे चंद्रशेखर दाणी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा यांच्या वतीने तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी सचिव भारत घुगीकर कार्याध्यक्ष रवींद्र विद्वत सचिव बाळासाहेब होशिंग निलेश गंधे ‌यांच्या मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भटक्या विमुक्त आदिवासी ज्ञानपीठ एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, भाजपचे शहराध्यक्ष जगदिश आगरवाल,करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुका अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके राजुरीचे मा.सरपंच आबासाहेब ठापरे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्रा .रामदास झोळ सर ‌म्हणाले की संतोष काका कुलकर्णी यांनी करमाळा तालुक्यातील गरजु गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी जो उपक्रम राबवला आहे तो नक्कीच चांगला असून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेले कार्य नक्कीच महान आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असून दहावीनंतर विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी जे काही मदत लागेल ती आपण नक्की करू अशा समाजा उपयोगी उपक्रमाला सदर पाठबळ देणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सांगितले. या कार्यक्रमांमध्ये अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा तालुकाध्यक्ष ‌ संतोष काका कुलकर्णी यांना ‌ आदर्श उद्योजक पुरस्कार, मिळाल्याबद्दल व भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी जगदीश आगरवाल यांची निवड झाल्याबद्दल तसेच पत्रकार दिनेश मडके यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल या कार्यक्रमात अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळ्याचे वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.करमाळा तालुक्यातील सर्व समाजातील गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना दोन हजार वहया पेनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये तालुकाध्यक्ष संतोष कुलकर्णी नरेंद्रसिंह ठाकुर, दिनेश मडके, जगदीश आगरवाल ,रामकृष्ण माने यांनी मनोगत व्यक्त करून ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत घुगीकर काका स्वागत व सूत्रसंचालन रवींद्र विद्वत त्यांनी केले तर आभार शुभम कुलकर्णी यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago