Categories: Uncategorized

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सरांचा भाजपमध्ये उद्या प्रवेश निश्चित

करमाळा प्रतिनिधी:

दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील राजकीय समिकरणे मात्र निश्चितच बदलणारआहेत.प्रा. रामदास झोळ यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढविली होती. कोणत्याही पक्षाची साथ नसताना, कोणतेही राजकीय वजन नसताना त्यांनी शर्थीने खिंड लढवली.
करमाळा तालुक्यातील अनेक गांवाला पाणीपुरवठा,रस्त्यांना निधी, गोरगरिबांच्या मुलांना व मुलींना मोफत प्रवेश, वाशिंबे गावात कॉर्नर मिरर, वृद्धांना बाकडे, पाणी फाऊंडेशनच्या कामाला मदत, तरुणांना नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून हाताला काम असे अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केली आहेत. मकाई कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना मिळत नसलेली ऊसाची बिले वेगवेगळी आंदोलने करुनमिळवून दिली. ते देशातील मोठ्या पक्षात जात आहेत याचा करमाळा वासियांना आनंद तर आहेच याच बरोबर ते आणखी ताकदीने विकास कामे करतील, अशी अपेक्षा आहे. उद्या दिनांक ०८/०७/२०२५ रोजी मुंबई मंत्रालय येथे प्रा. झोळ भाजपात प्रवेश करतील असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यांच्याबरोबर अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, काही सामाजिक कार्यकर्तेही प्रवेश करणार आहेत.
करमाळा तालुक्यातील व जिल्ह्यातील बहुसंख्येने पदाधिकाऱ्यांनी प्रा. रामदास झोळ यांच्याबरोबर भाजपात प्रवेश करुन जगात मोठी लोकशाही असलेल्या देशाची लोकशाही बळकट व्हावी आणि भाजपा सारख्या मोठ्या पक्षात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. रामदास झोळ फाऊंडेशन, प्रा. रामदास झोळ मित्र मंडळ व संपर्क कार्यालयाने केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago