Categories: करमाळा

करमाळा तालुक्यात कमळ फुलणार प्राध्यापक रामदास झोळ कन्हैयालाल देवी सूर्यकांत पाटील यांनी केला मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश ….

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर, अर्बन बँकेचे चेअरमन देवी गटाचे नेते कन्हैयालाल देवी, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सूर्यकांत पाटील यांनी भाजपचे मा. प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ.रश्मी दीदी बागल, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे ,यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.करमाळा तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काम घराघरापर्यंत पोचून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे कमळ फुलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब , पालकमंत्री जयकुमार गोरे , माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‌आम्ही सर्वजण एक दिलाने काम करणार असल्याचे प्रवेश केलेल्या नेत्यांनी सांगितले.करमाळा तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढली असून गटातटाच्या राजकारणामध्ये अडकलेली नेतेमंडळी भाजपमध्ये आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये नक्कीच भाजप सत्ता काबीज करणार असा विश्वास प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये दिसून येत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago