Categories: Uncategorized

श्रम रक्षा भवन, मुंबई वाडी बंदर डेपो येथे रेल्वे युनियन कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

करमाळा प्रतिनिधी श्रम रक्षा भवन, मुंबई वाडी बंदर डेपो येथे रेल्वे युनियन कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.मुंबईतील श्रम रक्षा भवन येथे नुकतीच रेल्वे युनियन कामगारांच्या मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब चव्हाण सचिव श्री . अमितजी भटनागर तसेच विनायक येसने यांच्या नेतृत्वात चीफ लेबर कमिशनर श्री. संजय डाबी यांच्याशी रेल्वे युनियन कामगाराच्या समस्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेमध्ये कामगारांच्या अनियमित वेतन, सेवाशर्ती, कंत्राटदाराकडून गैर वर्तणूक तसेच अन्य मूलभूत अडचणींचा समावेश होता. रेल्वे युनियनचे पदाधिकारी यांनी कामगाराचे प्रतिनिधींत्व करून आपली मते, अडचणी व तक्रारी स्पष्टपणे मांडल्या.चीफ . लेबर कमिशनर संजय डाबी यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या व संबंधित विभागांशी समन्वय साधत काही समस्यांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. उर्वरित प्रलंबित प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या बैठकीमुळे रेल्वे युनियन कामगारांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण झाले असून, कामगार हितासाठी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे व रेल्वे युनियनचे पदाधिकारी कामगाराच्या सदैव सोबत आहेत याची खात्री त्यांना मिळाली.भविष्यातही रेल्वे युनियन कामगारांच्या समस्या वर व प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन कामगाराचे प्रश्न सोडवण्याचा सदैव प्रयत्न केला जाईल.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago