Categories: करमाळा

करमाळा पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी आरोपीस अटक करून एक लाख साठ हजाराचे दागिने हस्तगत दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी सोने चोरीतील आरोपीस अटक करुन १,६०,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत-गुन्हयात वापरलेल्या मोटारसायकलसह सुमारे २,००,०००/-रु किंमतीचा मुददेमाल आरोपीकडून हस्तगत केला आहे.

यात हकीकत अशी की, दि.१५/०२/२०२५ रोजी दुपारी ०३/०० वा चे सुमारास टाकळी चौक येथुन पुढे दोन किमी अंतरावर ता. करमाळा, जि. सोलापुर येथे यातील फिर्यादी आशा सोपान रणसिंग, वय ४८ वर्षे, रा. खातगाव, ता. करमाळा, जि. सोलापुर व्यवसाय नौकरी प्राथमिक आरोग्य केंद्र राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर या वरील ठिकाणावरुन जात असताना त्यांची पर्स खाली पडली त्यावेळी मोटारसायकल क एम एच ४२ बी एम ६५१० वरील अज्ञात इसम हा फिर्यादी या फोनवरती बोलत असताना फिर्यादीची पर्स ही फिर्यादीकडे उचलुन देण्याचे बहाण्याने फिर्यादी यांचे पर्समधील १,६०,०००/- रु किमतीचे अंदाजे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे चैनचे गळयातील गंठण जु. वा. किं.अं. हे फिर्यादीचे संमतीविना चोरुन नेले आहे तसेच फिर्यादी यांनी सदर अनोळखी इसमास पुन्हा पाहील्यास ओळखेन म्हणुन वगैरे अशा आशयाची फिर्याद करमाळा पोलीस ठाणेस गु र नं. ११८/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल झाली.सदर फिर्यादीचे अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी लागलीच पथक तयार करुन त्यांना वरील मोटार सायकलची माहीती घेवून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना योग्य त्या सुचना देवून सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंघाने रवाना केले. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी सदर गाडीच्या मालकाची माहीती काढली. तसेच घटनेच्या वेळी सदर मोटारसायकल कोणाच्या ताब्यात होती याबाबत अधिक तपास केला असता सदर मोटारसायकल ही घटनेच्या वेळी इसम  झिंगडया उर्फ हरी पानफुल्या भोसले, रा. टाकळी, ता. करमाळा याच्या ताब्यात होती अशी माहीती मिळाली, तसेच सदरची घटना घडल्यापासून सदर इसम हा फरार असले बाबत माहीती मिळाली. सदर माहीतीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दोन पथके तयार करुन सदर संशयीत आरोपीची माहीती काढण्यासाठी योग्य त्या सुचना देवून रवाना केले होते. सदर तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना संशयीत आरोपी नामे झिंगडया उर्फ हरी पानफुल्या भोसले, रा. टाकळी, ता. करमाळा हा इंदापूर, दौंड, भिगवण, श्रीगोंदा पोलीस ठाणे हददीमध्ये वारंवार वास्तव्य बदलून राहत असल्याची माहीती मिळाली, त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की सदर आरोपी भिगवण, जि. पुणे येथे आला आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना तात्काळ रवाना करून वरील आरोपीस ताब्यात घेतले. त्याचे कडे सदर गुन्हयाबाबत सखोल तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली परंतू त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल तपास केला असता त्याने सदर गुन्याची कबूली दिली तसेच सदर गुन्हयातील चोरी केलेला मुददेमाल गुन्हयातील चोरीस गेलेले १,६०,०००/-रु किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच ४०,०००/-रु किंमतीची गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा सुमारे २,००,०००/-रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहे का  शेख हे करत आहेत.

सदर आरोपीवर यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत-

१) दौंड रेल्वे पोलीस ठाणे गुरनं. १४/२०११ भादवी कलम ३९५

२) दौंड रेल्वे पोलीस ठाणे गु र नं. १३/२०१४ भादवी कलम ३९५ सह आर्म अॅक्ट ४, २५ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.सदरची कामगीरी ही श्री. अतुल कुलकर्णी साो, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर साो, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील साो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोहेकों  अजित उबाळे, पोना मनिष पवार,वैभव ठेंगल, पोकॉ .अमोल रंदिल, पोकॉ/.योगेश येवले, गणेश खोटे, समाधान भराटे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ  व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

 

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

4 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago