Categories: करमाळा

करमाळयात बांधकाम साहित्य भांडीवाटप सेंटर सुरू करावे बांधकाम कार्यालय बनले दलालांचा अड्डा सुधारणा न झाल्यास अन्यथा तीव्र आंदोलन करू- महेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील बांधकाम कामगारांना मिळणारे सर्व साहित्य करमाळा कार्यालयातूनच वाटप करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी राज्याचे बांधकाम आयुक्त सुरेश कुंभार यांच्याकडे केली आहे.
करमाळा तालुक्यात जवळपास वीस हजार बांधकाम कामगार असून सध्या बांधकाम कामगार मंत्रालयाने बांधकाम साहित्याचे वाटप सोलापूर येथून चालू केले आहे.
करमाळा तालुका सोलापूर पासून 135 किलोमीटर अंतरावर असून शासनाकडून मिळणारे बांधकाम साहित्य भांडी आदी वस्तू आणण्यासाठी बांधकाम कामगाराला जवळपास दोन हजार रुपये खर्च करून सोलापूरला जावे लागते .
शिवाय एक दिवस वाया जाऊन एक दिवसाचा पगार बुडतो . सोलापूरचे भांडी वाटप गोडाऊन एसटी स्टँड पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे.जाणीवपूर्वक काही ठेकेदार व दलालांच्या दबावाला बळी पडून बांधकाम कामगारांची लूट करण्यासाठी सोलापूर येथे मुद्दाम कामगारांना बोलावले जाते.
करमाळा शहरात तयार करण्यात आलेले बांधकाम कार्यालयासाठी शासन 5 कर्मचाऱ्यांसाठी दीड लाख रुपये महिना पगार देते. मात्र येथे केवळ या कार्यालयात दलाली चालू असून दोनच कामगार काम करत असून तीन कामगारांचा पगार हडप केला जात आहे. या कार्यालयात फर्निचर घेण्यासाठी शासनाने दोन लाख रुपये दिले असून गाळे भाडे म्हणून प्रति महिना 15000 दिले जातात.सध्या करमाळातील बांधकाम कार्यालय दलालांचा अड्डा झाला आहे.
करमाळा तालुक्यातील काही राजकीय पुढार्‍यांनी जे चार चाकी वाहनात फिरतात अशांनी या दलालांना हाताला धरून आपल्या स्वतःच्या बायकोला बांधकाम कामगार दाखवून शासनाचा लाखो रुपयांचा लाभ उठवला आहे.बांधकाम कामगार अनुदान मिळवण्यासाठी या तथाकथित पुढाऱ्यांनी आपल्या बायकोच्या धर्मपत्नीच्या डोक्यावर दगडाची पाटी देऊन फोटो काढून मजूर संस्थेकडून कामगार असल्याचा दाखला मिळवला आहे.
मजूर संस्था सुद्धा हा दाखला देण्यासाठी प्रत्येकी बांधकाम कामगाराकडून कडून दोन हजार रुपये घेत आहेत.एकंदरीत जो खरा गरीब बांधकाम कामगार आहे त्याला या योजनेचा लाभ मिळत नाही मात्र दलालांची दलाली भरली की पुढार्‍यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळतो अशी विचित्र परिस्थिती आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती सुद्धा काही पुढारी स्वतःच्या मुलाच्या नावावर लाखो रुपये हडप करत आहेत.
या कार्यालयातील दलालांचा बंदोबस्त होऊन जे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांना सर्व लाभ मिळाले नाही तर या कार्यालय ठेकेदाराच्या तोंडाला काळी फासू असा इशारा दिला आहे.शिवसेना कार्यालयातून गेल्या सहा महिन्यात जवळपास 1300 महिलांची बांधकाम कामगार म्हणून रजिस्ट्रेशन केलेले आहे मात्र अद्याप एकालाही फायदा मिळाला नाही. करमाळातील बांधकाम कार्यालयात कोणतेही काम करण्यासाठी पैसे मोजावे लागतात.बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये भांडी साहित्य मिळवण्यासाठी 2500 रुपये 60 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पंधरा हजार रुपये अशाप्रकारे या खात्यातील दलाल बांधकाम कामगाराकडन रकमा घेत आहेत. याचीही चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

4 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago