Categories: करमाळा

पूर्वीच्या मंजूर विकास कामांची उद्घघाटने करण्यातच विद्यमान आमदार धन्य… केम ढवळस  रेल्वे भुयारी मार्गाच्या भूमिपूजन समारंभात मा.आ. संजयमामा शिंदे यांची टीका


करमाळा प्रतिनिधी
केम ढवळस हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रं 14 असून रेल्वे लाइन कि.मी क्र.359/26, 359/28 या मार्गांवर रेल्वे लाईन असल्यामुळे केम गावाच्या रेल्वे लाईन पलिकडे छोटी मोठी सुमारे 7 ते 8 गावे असून केम ढवळस व इतर गावांना जोडण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे गावातील लोकांना व आजूबाजूला असणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी रेल्वेच्या भुयारी मार्गासाठी प्रसंगी राज्य सरकारच्या बजेट मधून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान रेल्वे विभागाने सहकार्याची भूमिका दाखवत त्यांच्या बजेट मधूनच संबंधित भुयारी मार्गासाठी निधी मंजूर केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला.आज दिनांक 11 जुलै रोजी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते या कामाचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला. याप्रसंगी विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवरती त्यांनी टीकास्त्र सोडले.
2019 ते 24 या कालावधीत आपण मोठ्या प्रमाणावर विकास कामे मंजूर करून घेतली याच कामांचे नारळ फोडण्याचे काम विद्यमान आमदार करत असून एकही नवीन काम त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अद्यापही मंजूर केलेली नाही. उलट मंजूर असलेली विकास कामे बंद करण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. एकीकडे दहीगाव उपसा सिंचन योजनेचे काम बंद नलिकेतून करावे अशी मागणी विधानपरिषद सभागृहांमध्ये आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील करत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते असलेले आमदार नारायण पाटील मात्र या कामाला विरोध करत आहेत हा विरोधाभास का आहे ? याचा जाब केम व वडशिवणे ग्रामस्थांनी विचारला पाहिजे. वडशिवणे तलावात पाणी दिले म्हणून डंका पेटवला जातो परंतु त्या तलावाला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आपण तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2024 मध्येच पत्र दिले होते. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम बंद नलिका वितरण प्रणालीतून झाल्यानंतर बचत होणाऱ्या 0.46 टीएमसी पाण्यामधून अतिरिक्त गावांना पाणी देता येईल त्यामध्ये वडशिवणे तलावही आहे.एखाद्या भागाचा कायापालट करायचा असेल तर त्यासाठी कायमस्वरूपी तरतूद करावी लागते .विद्यमान आमदार मात्र वरवरची मलमपट्टी करण्यामध्येच व्यस्त आहेत. मागेल त्याला पाणी देण्याचे धोरण त्यांनी उन्हाळी आवर्तनात राबविले त्याचा फटका कायमस्वरूपी योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या वरकटणे, सरपडोह ,सौंदे,साडे या गावांना बसला हे धोरण चुकीचे आहे असाही घनाघात त्यांनी केला.
यावेळी उद्धव दादा माळी, संदीप तळेकर प्रहार संघटना तालुकाध्यक्ष, अच्युत काका पाटील, विष्णू दादा पारखे, मारुती पारखे ,,उपसरपंच सागर कुरडे, केम ग्रा.पं. सदस्य,गोरख काका पारखे, सुलतान मुलाणी, योगेश ओहोळ, विष्णू अवघडे, दत्तात्रय बीचितकर, विजयसिंह ओहोळ, सचिन काळे ,उत्तरेश्वर सुरवसे, गणेश तळेकर, निंभोरे सरपंच रवींद्र वळेकर, अण्णासाहेब पवार, सूरज ढेरे, शिवसेना जिल्हा समन्वयक सागर राजे तळेकर, अरुण लोंढे चेअरमन,चंद्रकांत तळेकर सर,सचिन रणशिंगारे, संजय नवले, बालाजी अवताडे, धनंजय ताकमोगे, विकास कळसाईत, महादेव पाटमास, रिझवान झारेकरी, विष्णू ओहोळ, नागेश सुरवसे, बाजीराव तळेकर, राजू तळेकर, दीपक तळेकर,बळीराम तळेकर ,नवनाथ सुरवसे, उत्तरेश्वर सुरवसे,संतोष कुर्डे,सुरेश देवकर,हरिभाऊ तळेकर,संजय आप्पा तळेकर,बापू तळेकर,अशोक तळेकर, पिनु तळेकर, अण्णासाहेब तळेकर,तानाजी तळेकर ,कांतिलाल पवार,ईश्वर मस्के, दत्ता वळेकर,नाथ शिंदे, बाळू सुरवसे, राजेंद्र देवकर यांच्याबरोबरच जनई वस्ती, बीचितकर वस्ती व बाराबाई वस्ती वरील व ढवळस व केम पंचक्रोशीतील युवा वर्ग शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शंभूराजे जगताप यांचा टीडीएफतर्फे गौरव टीडीएफचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

9 hours ago

सांगोल्यातील डॉ.धनाजी जगताप व डॉ.सारिका जगताप यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषध उपचार

सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…

19 hours ago

करमाळ्याच्या मातीतील रंगांचा दिल्लीच्या क्षितिजावर आविष्कार… चित्रकार निवास कन्हेरे यांचे ‘Prismatic Resonances’ चित्रप्रदर्शन; २३ नोव्हेंबरपासून राजधानीत कलात्मक पर्वणी

  करमाळा  प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…

19 hours ago

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

  करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…

1 day ago

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…

2 days ago