Categories: करमाळा

जेऊर ता.करमाळा येथे २ कोटी ५० लक्ष “जेऊर बसस्थानकाचा भूमिपूजन समारंभ आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते संपन्न

करमाळा प्रतिनिधी जेऊर ता.करमाळा येथे २ कोटी ५० लक्ष “जेऊर बसस्थानक” भूमिपूजन समारंभ करमाळा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री.नारायण(आबा)गोविंदराव पाटील यांच्या शुभहस्थे पार पडला.
त्यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की,जेऊर गावच्या ग्रामपंचायत सदस्य पासून ते करमाळ्याचे आमदार होण्यामाघे मतदारसंघातील जनतेच्या सहकार्याबरोबरच जेऊर गावच सहकार्य ही तितकंच माझ्यासाठी महत्वाचं आहे.जेऊर गावात आजूबाजूच्या 25-30 गावांचा संपर्क असुन जेऊर रेल्वे स्टेशनंवर बऱ्याच गाड्यांचा थांबा असल्याने बरेच प्रवाशी बस ने जेऊर या ठिकाणी प्रवास करत असतात त्यांना बस स्थानकावर सुख-सुविधा मिळण्यासाठी आपण वारंवार शासन दरबारी निधीनी मागणी केली होती.आपल्या मागणीचा विचार करता आपल्याला जावळपास अडीच कोटी इतका निधी मंजूर झाला असुन लवकरच कामाला सुरुवात होऊन सुसज्ज असं बस स्थानक उभारल जाणार असुन प्रवाशांसाठी सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याच आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.
त्यावेळी पंचायत समितीचे सभापती पै.अतुल भाऊ पाटील,जेऊर गावचे लोकनियुक्त सरपंच पै.पृथ्वीराज भैय्या पाटील,राजुशेठ गादीया,भास्कर भाऊ कांडेकर,धनंजय शिरसकर,भारत आण्णा साळवे,राजु लोंढे,शांताराम सुतार तसेच जेऊर येथील ग्रामस्त व जेऊर ग्रामपंचायतचे आजी -माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago