करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील हिसरे येथील ग्रामदैवत मरीमाता आई यांची यात्रा येत्या 15 जुलै 2025 मंगळवारी होणार असल्याची माहिती हिसरे ग्रामस्थ तसेच जत्रा कमिटीने दिली आहे
याबाबत यात्रा कमिटीने अधिक माहिती देताना सांगितले की करमाळा तालुक्यातील हिसरे येथील ग्राम दैवत मरी माता आई यांची यात्रा प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी येत्या मंगळवारी असून याच दिवशी गावातील ज्ञानदेव लोंढे हे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम करणार आहे गाड्या होण्याच्या कार्यक्रमाला करमाळा तालुक्यातील असंख्य भक्ती गण मोठ्या संख्येने उपस्थित असतात याच दिवशी गावातील प्रत्येक भक्तगणाच्या घरी कंदुरी चा कार्यक्रम असतो याचा मनमुरांदपणे भाविक आस्वाद घेतात सदर यात्रेमध्ये मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने सहभागी असतात.प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी सदरची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून सदर यात्रेला करमाळा तालुक्यातील अनेक भक्तगण तसेच पुणे मुंबई सोलापूर येथील भक्तगण देखील मोठ्या संख्येने हजेरी लावतातसदर जत्रेच्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जत्रेची शोभा वाढवावी असे आवाहन हिसरे येथील ग्रामस्थ तसेच यात्रा कमिटीने केली आहे.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…