Categories: करमाळा

प्रविणदादा गायकवाड यांचेवर झालेल्या हल्याच्या निषेधाबाबत सकल मराठा समाज बहुजन बांधव यांच्यावतीने करमाळा तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांना निवेदन

करमाळा प्रतिनिधी प्रविणदादा गायकवाड यांचेवर झालेल्या हल्याच्या निषेधाबाबत सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांच्या वतीने करमाळा तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांना निवेदन देण्यात आले.
सकल मराठा समाज व बहुजन बांधव करमाळा यांचे वतीने विनंती जाहीर आवाहन करतो की, काल अक्कलकोट येथे संभाजी बिग्रेडे चे नेते प्रविण दादा गायकवाड यांचेवर दिपक काटे व अन्य संबंधित यांनी खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्यातून प्रविणदादांना शाई लावण्याचा प्रयत्न झाला या घटनेचा आम्ही जाहीर तीव्र शब्दांत निषेध .तसेच प्रविणदादा गायकवाड यांना धक्काबुक्की करणे, हाताने मारहाण करणे, गाडीवर दगडफेक करणे व जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अशी घटना घडली आहे. गेल्या अनेक वर्षापासून बहुजन समाजातील तरूणांना उद्योगाची वाट दाखविणारे पुरोगामी विचारांचे प्रविणदादा गायकवाड यांचेवर झालेला हल्ला निषेधार्त आहे. आरोपींवर तात्काळ मोक्का अंतर्गत व तडीपार सारख्या सक्त कलमे लावून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाज व बहुजन बांधव करमाळा यांच्या वतीने करण्यात येत आहे. शाई फेक करणारा दिपक काटे हा खुनी आरोपी असून त्याने स्वतःच्याच भावाचा खुन केला होता हे सत्य आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये प्रविणदादा गायकवाड यांना गृहमंत्रालय यांनी संरक्षण द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे यावेळी सकल मुस्लिम समाज सकल धनगर समाज व आंबेडकरवादी चळवळ करमाळा भीम आर्मी रासप बहुजन संघर्ष सेना आदी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा व्यक्त केला.यावेळी मोठमोठ्याने घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला व करमाळा शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

8 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago