Categories: करमाळा

करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा प्राध्यापक रामदास झोळ सर यांना ग्रामीण भागात उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल विकसित भारत सन्मान 2025 पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे सुपुत्र दत्तकला शिक्षण संस्थेचे प्राध्यापक रामदास झोळ सर यांना ग्रामीण भागात उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल विकसित भारत सन्मान 2025 या पुरस्काराने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे एका भव्य समारंभात हा सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोण्याचे काम त्यांनी केले असून ग्रामीण स्तरांवरील तांत्रिक व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्वामी चिंचोली भिगवण येथे 5000 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करून ग्रामीण भागामध्ये उच्च दर्जाच्या व्यावसायिक शिक्षणाची सोय केल्यामुळे अनेक युवक नोकरी रोजगार करून आपल्या पायावर उभे राहण्याचे कार्य प्राध्यापक रामदास झोळ यांनी केले आहे .त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्या धर्मपत्नी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ मॅडम यांचा मोलाचा वाटा आहे. ग्रामीण भागामध्ये जन्म घेऊन उजाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचे काम केले असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेतली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‌ यांनी आत्मनिर्भर भारत करण्यासाठी युवकांना ‌ कौशल्य विकास‌ शिक्षणाला प्राधान्य दिले असून ‌ ग्रामीण भागातील युवकांना व्यावसायिक शिक्षण दिल्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत कार्याला ‌ खऱ्या अर्थाने आपल्या शैक्षणिक कार्यातून प्रोत्साहन देण्याचे काम प्राध्यापक रामदास झोळ माया झोळ मॅडम यांनी केल्यामुळे भारत देशातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.प्राध्यापक रामदास झोळसर यांना विकसित भारत सन्मान 2025 पुरस्कार मिळाल्याबद्दल दत्तकला शिक्षण संस्था प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विशाल बाबर ,उपप्रचार्य सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद याबरोबर शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

18 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

21 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago