वीणा पवार- एक आभाळी व्यक्तीत्व आयुष्यात वळणा-वळणावर अनेक व्यक्ती भेटतात.काहींचा विसर पडतो काही मनात घर करून राहतात.घट्ट बिलगून राहतात.अशी काही वास्तवातली माणसं मनात आचरणात साठवून ठेवावी लागतात.
मा.वीणा ज्ञानदेव पवार एक आभाळी व्यक्तीत्व.आपल्या कर्तुत्वाने गगन उंचीवर पोहचलेली एक महिला अधिकारी.
कोरोना सारख्या महामारीच्या विळख्यात जग पूर्णात: कोलमडून गेलय.पण..सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातील कोरोना नियंत्रणात आहे .ते म्हणजे सक्षम पोलिस यंत्रणा.. जागरूक नगरपालिका आणि सहयोगी जनता आणि मुख्याधिकारी वीणा पवार यामुळे.
खरच अशा काही महिला ज्या कामाशी ईमान राखतात..उर्जा देतात..जगण्याची दिशा दाखवतात.खुर्चीतला अधिकारी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मा. वीणा पवार.
त्या मूळच्या बीड जिल्ह्यातील (ता. पाटोदा ) धनगरजवळका येथील आहेत.त्यांचे शिक्षण म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झाले.एम एस सी कृषी मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.प्रशासकिय सेवेतच जायचे हे त्यांनी आधी ठरवून टाकले होते.दिशा ठरवून पाऊल टाकणे हे आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कडून शिकण्यासारखे आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांनी कृषीमित्र एकता मंच या संघटनेच्या मार्गदर्शनातून केली.मैत्रीणींच्या समूह चर्चेतून त्या अभ्यास पूर्ण करत.अनेक छंद कलांनी त्यांचे व्यक्तीमत्व अधिक गडद होत गेले.
एकांकिका ,बॅडमिंटन, व्हॉलीबॉल अशा क्षेत्रांत ही त्यां राज्यस्तरावर पोहचल्या.अष्टपैलू व्यक्तीमत्व यालाच म्हणतात.
ज्या वयात घडण्यापेक्षा तरुणपीढी भरकटत जाते त्या वयात त्यांनी पुस्तके हाती घेतली.कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांचा त्यांच्या विकासात खूप मोठा वाटा आहे.
महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून सक्षम बनावे ..महिलांच्या हातात चार पैसे असावेत हा त्यांचा वैचारिक सूर ग्रामिण भागातील महिलांना दिशा देणारा ठरत आहे.महिलांसाठीची त्यांची धडपड त्यांना स्वस्थ बसू देत नाही.उद्योग उभारणी साठी चर्चा सत्र , आरोग्य शिबीरे, रोजगार निर्मिती प्रशिक्षण,इ.योजना त्यांनी मा.नगराध्यक्ष वैभव राजे जगताप तसेच न.पा. चे इतर पदाधिकारी,कर्मचारी यांच्या सहकार्याने राबवल्या.उल्लेखनीय कामाचे श्रेय त्या मा.नगराध्यक्ष, पदाधिकारी यांना देतात. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, सारख्या विषयाची आवड त्यांनी करमाळकरांत निर्माण केली.महिला सबलीकरणावर चा त्यांचा उत्साह वाखावण्याजोगा आहे.२००० पेक्षा जास्त एल ई डी लाईट केंद्र शासनाच्या ई एस एस एल योजनेतून बसवली आहेत.महिला बचतगटाच्या कामा मध्ये क वर्ग नगरपालिकेत महाराष्ट्रात करमाळा न.पा चा प्रथम क्रमांक आहे.ही गौरवास्पद बाब आहे.
अशा कार्य करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची नोंद आपण घ्यायला हवी.
नियम,कायदे तोडायचे नसतात तर ते काटेकोरपणे पाळायचे असतात. या गोष्टी त्यांनी किती सहजपणे तर कधी कठोरपणे माणसांत रूजवल्या.
मा.वीणा पवार यांचे कार्य खरच दखलपात्र आहे.हे अधोरेखित करायला नक्की आवडेल.
पुन्हा एकदा त्यांची कोरोना महामारी च्या काळातील ठळक ओळख मला इथे मांडाविशी वाटते.
मास्क लावा, बाहेर पडू नका, काळजी घ्या,घाबरू नका, अशा सूचना सांगण्यासाठी त्या बाहेर पडत.”मॅडम आल्या रे पळा!”
हा स्वर नियम, कायदे तोडणार्यांच्या ओठी येतो.नियमतोडणार्यांच्या मनात त्यांची दहशत कायम आहे.खरच शिस्त त्यांनी प्रखरपणे मनांवर बिंबवली आहे.
प्रामाणिक पणे केलेल्या कार्याला मोल असते.त्यामुळेच व्यक्तीमत्व आणखी धारदार बनते.
कार्यकरण्याची त्यांची कैफ कायम आहे.त्यांचे पती मा.ज्योतिर्लिंग पाटकर हे सहाय्यक अभियंता उजनी कालवा पाटबंधारे विभाग सोलापूर येथे प्रशासनात कार्यरत आहेत.
निर्धार, निर्भयता, जिद्द,कार्याची एक अनोखी पद्धत यांचे अचाट दर्शन म्हणजे मा.वीणा पवार होय.
त्यांच्या पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा.
बये! जगणं शिकवलंस तू
बये! लढणं शिकवलंस तू
हिरकणी शिवकालीन तू
कर्तव्य आणि मायेपोटी
बुरूज …
चढणं आणि उतरणं
शिकवलंस तू.
जयहिंद!!
©️✍अंजली श्रीवास्तव करमाळा.७७०९४६४६५३(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आणि वक्ता आहेत).
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…