Categories: Uncategorized

रिटेवाडी उपसा सिंचन नियोजनाच्या सर्वेक्षणाबाबत जलसंपदामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना :आमदार नारायण पाटील

विधानभवन येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे उपस्थितीत झाली बैठक

करमाळा प्रतिनीधी

करमाळा तालुक्यातील नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना जलसंपदामंञी राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे .
रिटेवाडी उपसा सिंचन योजना, दहिगाव उपचा सिंचन खोली वाढवणे व माढा तालुक्यातील सीना माढा उपसा सिंचन योजनेत कुर्डु, पिंपळखुटे, अंबाड गावाचा समावेश करण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे बैठक घेण्यात आली.

या बैठकीला माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, जलसंपदा विभाग सचिव दीपक कपूर, यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार
आशीर्वाद हे ऑनलाइन उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसासिंचन योजनेला मंजुरी मिळावी याबाबत आपण पाठपुरावा करत असून याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला आहे .विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली .या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना रिटेवाडी उत्सव सिंचन योजनेबाबत तात्काळ सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत . तसेच कुर्डू, पिंपळकुंटे या भागाला सीना माढा योजनेतून ओव्हर फ्लोचे पाणी देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना जलसंपदा मंत्र्यांनी सूचना दिली आहेत†”*”””””””””””””””””””””””””””””””.  दहीगांव उपसा सिंचन योजनेची पाणी पातळी 490 मीटर आहे उजनी धरणाची पाणी पातळी कमी झाल्यानंतर दहिगाव उपचा सिंचन योजनेच्या पंपाला पाणी मिळत नाही .त्यामुळे या पाणी पातळीत वाढ करण्याची मागणी केली असून याला जलसंपदा मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आमसभेत ठराव घेण्यात आला होता. त्यानंतर आपण विधानसभेतही दहिगांव उपचा सिंचन योजनेची पाणी पातळी वाढवण्याबाबत विधानसभेत आपण प्रश्न उपस्थित केला आणि आजच्या बैठकीत जलसंपदा मंत्री यांनी ही पाणी पातळी वाढवण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली आहेत. –आमदार नारायण पाटील

 

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago