Categories: Uncategorized

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट नव्या पत्रकारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

 

 

ठाणे  प्रतिनिधी 
‘जबरी खबरी’ या मराठी डिजिटल चॅनेलला ज्येष्ठ संपादक, माध्यमतज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांनी सदिच्छा भेट दिली. ठाणे येथील विजू माने यांच्या अद्ययावत कार्यालयात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात त्यांनी नव्याने कार्यरत होणाऱ्या पत्रकारांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. पत्रकारितेची नैतिकता, सामाजिक जबाबदारी,सत्यनिष्ठा आणि लोकशाही मूल्यांवर त्यांचे विचार मांडले.
‘जबरी खबरी’ हा प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि कल्पक “इमेज बिल्डर व इव्हेंट ऑर्गनायझर” अशी ख्याती असलेले विजू माने यांचा डिजिटल उपक्रम असून, समाजाभिमुख आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी कार्यरत आहे. या कार्यक्रमाला विजू माने यांच्यासह चॅनेलची संपूर्ण टीम उपस्थित होती.
कार्यक्रमात राजा माने यांनी ‘जबरी खबरी’चे चॅनलचे प्रमुख सल्लागारपद स्वीकारले. सोबतच कुंदन हुलावडे आणि दीपक नलावडे यांनी देखील सल्लागारपद स्वीकारले. राजा माने हे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना तसेच प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष असून, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. पत्रकारांच्या हितासाठी त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावलेली आहे.
यावेळी पत्रकारांना उद्देशून बोलताना राजा माने म्हणाले, “डिजिटल मिडिया ही आजच्या पत्रकारितेची गरज आणि भविष्य आहे. मात्र केवळ ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’च्या मागे न लागता समाजभान ठेवणारी, सत्याशी निष्ठा राखणारी आणि लोकशाहीचे मूल्य जपणारी पत्रकारिता हीच खरी गरज आहे. ‘जबरी खबरी’ चॅनेलने अशीच दिशा कायम ठेवावी, हीच माझी अपेक्षा आहे.”

‘जबरी खबरी’ चॅनेल स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या, अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि सामाजिक भान असलेले वार्तांकन सादर करते.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

4 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago