Categories: करमाळा

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालणार-दिनेश भांडवलकर

 

 

करमाळा (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा गळीत हंगामात कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दिनेश अंबादास भांडवलकर यांनी दिली. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक व जनरल मॅनेजर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना चेअरमन म्हणालेकी कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, ऊस तोडणी वाहतुकदार व कर्मचारी हे आमच्या कारखान्याच्या व्यवस्थापनाचा परिवाराचाच भाग असून आतापर्यंत कारखाना व्यवस्थापणाने वेळोवेळी सर्वांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय सहकार विकास निगम (एन.सी.डी.सी.) नवी दिल्ली यांनी मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेपैकी कामगारांच्या थकीत पगाराबाबतीत सकारात्मक निर्णय घेऊन एन.सी.डी.सीचे मार्गदर्शक तत्वानुसार थकीत वेतनाची रक्कम वार्षिक २५ टक्के प्रमाणे अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे कारखान्यातील उर्वरीत कर्मचारी यांनी तातडीने आपापल्या कामावर हजर होण्याचे आवाहन चेअरमन यांनी या प्रसंगी केले.तसेच ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार करण्याचे काम पूर्ण झालेले असून कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने आपापले योगदान देवून येणारा गळीत हंगाम वेळेत सुरु करावा जेणेकरुन आपल्या तालुक्यातील ऊस उत्पादकांची इतर कारखान्याकडून सर्व बाबतीत होणारी पिळवणून थांबवता येईल. सुदैवाने यावर्षीचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी वातावरण चांगले आहे. ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे मालक आहेत कारखाना सुरु करण्यास उशीर झाल्यास त्यांच्या ऊस तोडणीवरती परिणाम होऊ शकतो तसे होवू न देणेची काळजी सर्व घटकांनी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे उर्वरीत कर्मचारी यांनी व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाचा आदर करुन यावर्षीचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपले योगदान द्यावे असेही आवाहन चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी योवेळी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago