Categories: Uncategorized

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

सांगोला प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी प्रत्येक मंडलात बैठका घेऊन नियोजन केले आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, विविध मोर्चा, आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

23 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago