Categories: करमाळा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या २२ जुलैच्या वाढदिवसानिमित्त गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी:-  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे,या उपक्रमाचा एक भाग म्हणून भाजपा करमाळा शहर मंडलाच्या वतीने दि. २२ जुलै रोजी भाजपा संपर्क कार्यालय गायकवाड चौक करमाळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिरासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा कार्यकर्त्यांना एक विशेष आवाहन केले आहे की “माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टर, फलक, जाहिराती यांवर खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, याच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने शुभेच्छा होतील.”

या सुचनेनुसार आम्ही करमाळा  येथे देवाभाऊंच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त कमीतकमी 555 व जास्तीत जास्त 1000 पेक्षा जास्त बल्ड बॅग संकलन करून  हा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम घेणार आहे. यावेळी भाजपा करमाळा मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीरच्या दृष्टीने आवश्यक नियोजन झाले असून जिल्ह्यात सर्वाधिक रक्त पिशव्या संकलन करण्याचा आमचा संकल्प आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

9 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

15 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago