Categories: करमाळा

डिजिटल मिडियाचा राज्यातील पहिला उपक्रम: पत्रकारांच्या मदतीसाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा पुढाकार.

करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डिजिटल पत्रकारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील डिजिटल मीडियासाठी ही एक ऐतिहासिक सुरुवात ठरली आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी डिजिटल मीडियामध्ये कार्यरत पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी शैक्षणिक, वैद्यकीय आणि क्रीडा मदतीचे आवाहन केले होते. त्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आर्थिक मदत केली आहे. ही मदत बार्शी येथील ‘रियल न्यू’चे संपादक हर्षद लोहार यांना करण्यात आली. हर्षद लोहार यांची मेंदूच्या दुर्धर आजाराने त्रस्त असल्याने नुकतीच शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यांच्या उपचारांसाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज होती. या पार्श्वभूमीवर, राजा माने यांनी मंत्री महोदयांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. ही मदत डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी आश्वासक आधार ठरतोय. राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावरून अशी सकारात्मक पावले उचलली गेल्यास, डिजिटल पत्रकारितेला नवे बळ मिळेल अशी आशा राज्यातील डिजिटल पत्रकारांमधून व्यक्त केली जात आहे.यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी हर्षद लोहार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना आधार दिला. “हर्षद लवकर बरे होऊन पुन्हा सक्रिय होतील” असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. हर्षद लोहार यांच्या मातोश्री श्रीमती वैशाली अशोक लोहार यांनी चंद्रकांत दादा पाटील साहेब, व राजा माने साहेबांचे आभार मानत पुढेही सहकार्य राहावं अशी भावनिक इच्छा व्यक्त केली.याप्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य संघटक तेजस राऊत, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, बार्शी तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, पत्रकार गणेश भोळे, अक्षय बारुंगुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री संत नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय प्रारंभ११ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी सोहळा महाप्रसाद,

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…

1 hour ago

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…

3 hours ago

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…

4 hours ago

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

1 day ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

1 day ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

2 days ago