Categories: करमाळा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त केम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन- सचिन बापू पिसाळ तालुकाध्यक्ष भाजपा ग्रामीण

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केम येथील विठ्ठल मंदिर येथे करण्यात आले आहे. करमाळा तालुका भाजपाचे करमाळा तालुका ग्रामीण अध्यक्ष सचिन पिसाळ यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ. रश्मी दीदी बागल कोलते भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या हस्ते प्रमुख नेतेमंडळीच्या मान्यवराच्या उपस्थितीत  संपन्न होणार आहे. पुढे बोलताना. सचिन बापू पिसाळ त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा कार्यकर्त्यांना एक विशेष आवाहन केले आहे की ” माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टर, फलक, जाहिराती यांवर खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, याच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने शुभेच्छा होतील.” या सुचनेनुसार आम्ही केम येथे देवाभाऊंच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त  1000 पेक्षा जास्त बल्ड बॅग संकलन करून हा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीरच्या दृष्टीने आवश्यक नियोजन झाले असून जिल्ह्यात सर्वाधिक रक्त पिशव्या संकलन करण्याचा आमचा संकल्प आहे.
 रक्तदात्यांच्या सोयीसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन रक्तदान करावे आणि इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन भाजपा करमाळा तालुका ग्रामीण  अध्यक्ष सचिन पिसाळ यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 hours ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

13 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

1 day ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago