करमाळा (प्रतिनिधी) :
तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दिनेश अंबादास भांडवलकर यांनी दिली. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक व जनरल मॅनेजर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना चेअरमन म्हणालेकी कारखान्याचे कर्मचारी वर्गाचे सन २०१६ पासून थकीत वेतन देणेबाबत मा. संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम (एन.सी.डी.सी.) नवी दिल्ली यांनी केलेल्या अर्थसह्यातुन त्यांचे मार्गदर्शक तत्वानुसार (गाईड लाईनप्रमाणे) एकूण थकीत वेतनापैकी वार्षिक २५ टक्के रक्कम अदा करणार आहोत. याबाबत आज सोमवार दिनांक २१/०७/२०२५ रोजी कामगाराशी चर्चा करुन वरीलप्रमाणे रक्कम अदा करणेचा निर्णय झालेला आहे. सध्या कारखान्याचे कामकाज प्रगतीपथावर असून तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद यांचा ऊस वेळेत गाळप होण्याच्या दृष्टीने मशिनरी दुरुस्तीची कामे वेळेत होणे गरजेचे आहे. सुदैवाने यावर्षी कार्यक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस व उजनी धरणाची पाणीसाठा मुबलक असल्याने ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे तालुक्यातील आपला सहकारी साखर कारखाना पुर्ण क्षमतेने चालणे गरजेचे आहे. त्यामुळे उर्वरीत सर्व कमचारी यांनी व्यवस्थापणाच्या निर्णयाचा आदर करुन त्वरीत कामावर हजर रहावे असेही आवाहन चेअरमन यांनी योवेळी केले.
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…