राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ‘निर्धार नवपर्वाचा’ कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोलापूर ग्रामीण चा जिल्हा पदाधिकारी संवाद मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष खा.सुनिलजी तटकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये संघटनात्मक बळकटीकरण जनसंपर्क वाढवणे व विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार हा सर्वसमावेशक विचार आहे, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आजपर्यंत राष्ट्रवादीने केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर,करमाळयाचे मा आ.संजयमामा शिंदे, पंढरपुर तालुक्याचे नेते कल्याणराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आनंदजी परांजपे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापुर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सेक्रेटरी लतीफ भाई तांबोळी , रामेश्वर मासाळ, दादा कोरे , शिवानंद पाटील, श्रीमती वर्षा शिंदे, युवक अध्यक्ष अभिषेक आव्हाड, करमाळा तालुका अध्यक्ष भरत आवताडे, श्रीमती दिपालीताई पांढरे यांसह जिल्हयातील विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट –
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व मी स्वतः मा आ संजयमामा शिंदे यांना सांगितले होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहावे .तुम्ही उभा राहिले नाही. चिन्हावर उभा राहिले असते तर निवडणुकीत विजयी झाले असते..
– प्रदेशाध्यक्ष खा.सुनिलजी तटकरे

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

17 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

18 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

24 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago