Categories: करमाळा

मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस; करमाळ्यातील आश्रमशाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप आदिनाथचे माजी प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांचा उपक्रम

करमाळा प्रतिनिधी 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येथील आदिनाथ कारखान्याचे माजी प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांनी करमाळा येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी संजय गुटाळ यांच्यासह आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक गणेश जगताप, समाधान चव्हाण, परमेश्वर सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. गुटाळ यांनी याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याला मिळालेले एक कार्यक्षम मुख्यमंत्री असल्याचे नमूद केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान ठेवून हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आणि भविष्यातही आश्रमशाळेस सहकार्य करण्याची ग्वाही दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरकुमार शिंदे यांनी केले, तर मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी शिक्षक भास्कर वाळुंजकर, विलास कलाल, विठ्ठल जाधव, विद्या पाटील, कुमार पाटील, प्रल्हाद राऊत, अधीक्षक बाळासाहेब शिंदे तसेच इतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

19 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

19 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

1 day ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago