Categories: करमाळा

शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते शिवसेनेच्या चार शाखांचे उद्घघाटन

करमाळा प्रतिनिधी-
करमाळा तालुक्यात चिखलठाण परिसरातील शिवसेनेच्या चार शाखांचे उद्घाटन शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तिथे शाखा सुरू करण्यात येणार असून याद्वारे लोकांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन चिखलठाण येथील मुख्य कार्यक्रमात बोलताना त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरू गव्हाणे होते. पुढे बोलताना बागल म्हणाले की, आम्ही केवळ निवडणुकांपुरते लोकांच्या दारात जात नाही तर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात कायम त्यांच्यासोबत असतो. करमाळा तालुक्यातील विविध अडचणी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील असून येणाऱ्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीनिशी लढवल्या जातील असेही यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. त्यांच्या हस्ते या परिसरातील केडगाव, कुगाव, चिखलठाण नंबर दोन व चिखलठाणनंबर एक येथील चार शाखांचे उद्घाटन करण्यात आले. चिखलठाण येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील सभागृहात झालेल्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र सरडे यांनी केले. यावेळी मकाई कारखान्याचे संचालक दिनकर सरडे, केरू गव्हाणे यांची भाषणे झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत चिखलठाणचे उपसरपंच अक्षय सरडे, राहुल गोळे, समाधान गव्हाणे, शशिकांत गव्हाणे, स्वस्तिक नलावडे, ॲड. दिगंबर साळूंके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाल गव्हाणे यांनी केले. या कार्यक्रमाला आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, मकाई कारखान्याचे संचालक सतीश निळ, राजेंद्र मोहोळकर, युवराज रोकडे, गणेश तळेकर, सरडे भाऊसाहेब, विष्णू चव्हाण, दत्तात्रय सरडे शेटफळचे माजी सरपंच मुरलीधर पोळ, केशव बोराडे, प्रकाश डोंगरे, महेश पोळ, दत्तात्रय शंकर प्रसाद सरडे, स्वास्तिक नलावडे, अनिकेत वीर, रणजीत गव्हाणे, स्वप्निल गोळे, धिरज सरडे, सत्यम रोकडे यांच्यासह या परिसरातील उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 hours ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

13 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

1 day ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago