Categories: Uncategorized

खचलेल्या डिकसळ पुलाची आमदार नारायण आबा पाटील‌ यांचेकडून पाहणी

करमाळा प्रतिनिधी सोलापूर व पुणे जिल्ह्यास जोडणारा करमाळा तालुक्यातील उजनी जलाशयावर अस्तीत्वात असलेला डिकसळ पुल खचल्याने दोन जिल्ह्यांमध्ये असलेला या भागातील संपर्क तुटला. उजनीच्या पातळीत वाढ झाल्याने हा पुल खचला गेला. यामुळे या भागात नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी हे वृत्त समजताच तातडीने पुलाची प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुध्दा बरोबर‌ घेतले. काही दिवसांपूर्वी आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचेकडे उजनी जलाशयावर बांधण्यात येणाऱ्या पुलांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जावा अशी मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात सुध्दा आमदार नारायण आबा पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला. एकतर डिकसळ पुल‌ हा सर्वात जुना ब्रिटिश कालीन पुल आहे. यास पर्याय म्हणुन नवीन पुल मंजुर आहे. तसेच या जुन्या पुलाचे ऑडीट शासनाकडून केले‌ गेले आहे. यामुळे सध्या तरी असलेले दळणवळणाचे एकमेव साधन म्हणुन डिकसळ पुल उरला होता. यामुळे आता या भागातील नागरिकांना दळणवळणाची सोय उरली नाही. यामुळे हा डिकसळ पुल तातडीने दुरुस्त केला जावा व‌ नव्या पुलाचे काम युद्ध पातळीवर पुर्ण केले जावे ही नागरिकांनी मागणी केली. आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी कार्यतत्परता दाखवत तातडीने या पुलाची पाहणी केली व‌ नागरिकांना धीर दिला. तसेच पुढील कामे तातडीने पुर्ण करण्याची सुचना अधिकाऱ्यांना दिली. या पाहणी वेळेस  किरण कवडे, नवनाथ बापू, नागनाथ लकडे, ज्ञानेश्वर दोडमिसे सरपंच टाकळी, राजेश साळुंखे, आनासाहेब गलांडे, नीलकंठ शिंदे, रवी खांडेकर, डॉ. पाटील, दिलीप काका गलांडे, सुरेश कांबळे, उत्तम गलांडे, आनंद धांडे, किशोर खांडेकर, अमोल गलांडे ,चंद्रकांत पाडुळे, रणजित गलांडे, सचिन गोडगे, राजेंद्र गोडसे, रवींद्र मोरे, शेंडगे बापू आदि उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

14 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

2 days ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

2 days ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

3 days ago