Categories: करमाळा

जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून काम करणारे करणारे संघर्षमय जीवनातून यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांचे कार्य प्रेरणादायी-विक्रमसिंह शिंदे

* करमाळा प्रतिनिधी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून काम करणारे करणारे संघर्षमय जीवनातून यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत श्री कमलाई साखर कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी व्यक्त केले.अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे करमाळा तालुका अध्यक्ष उद्योजक भरत भाऊ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. या सत्कार कार्यक्रमप्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे सामाजिक कार्यकर्ते महादेव आण्णा फंड, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, सुदर्शन पाटील, रामचंद्र पवार, पत्रकार जयंत दळवी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश मडके आकाश आवताडे , पै.महेश आवताडे सुनील काटे उपस्थित होते. पुढे बोलताना विक्रमसिंह शिंदे म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी जीवन कसे जगावे सामाजिक कार्यातून सर्वसामान्य जनतेची प्रश्न सोडून लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे भरत भाऊ यांचा जीवन प्रवास थक्क करणारा असून सामाजिक कार्यकर्ता ती यशस्वी राजकारणी म्हणून लवकरच जनता त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये देणार असून आई कमला भवानी मातेचा आशीर्वाद जनतेचे पाठबळ याचबरोबर आमच्या मैत्रीची साथ त्यांना कायम राहणार असून त्यांच्या सर्व कार्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.करमाळा तालुक्यातील विविध गावांमधून भरत भाऊ अवताडे यांना कार्यकर्त्यांनी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून सत्कार करून दूरध्वनी द्वारी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या असून सर्वसामान्य जनतेचा विश्वास भरत भाऊंनी मिळवला असून सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावणारा नेता म्हणून भरत भाऊ यांची ओळख झाली आहे.करमाळा तालुक्याचे विकासप्रिय माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून आपल्या गावाबरोबरच पंचक्रोशीमधील रस्ते पाणी वीज याबरोबरच तालुक्यातील विविध प्रश्न सोडवल्याने आपल्या हक्काचा माणुस म्हणुन सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये स्थान मिळवुन भरतभाऊंचा वाढदिवस त्यांच्या करमाळा येथील जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला.आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करत पांजरापोळ येथे मुक्या जनावरांना चारा वाटप विद्यार्थ्यांना खाऊ वाटप ‌ अन्नदान ‌ करून ‌ वाढदिवस आहे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला जन्मभूमी असलेल्या फिसरे गावाबरोबर पंचक्रोशीतील गावामध्ये मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

16 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

2 days ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

2 days ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

3 days ago