Categories: करमाळा

जिल्हा परिषद -पंचायत समिती, नगर परिषद निवडणुका जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिंका एकनाथजी शिंदे यांचे आवाहन

करमाळा : प्रतिनिधी :-

दोन वेळा आमदार असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत आल्यामुळे करमाळा तालुक्यातील शिवसेना मजबूत झाली असून येणाऱ्या जिल्हा परिषद -पंचायत समिती नगरपालिकाआदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून करमाळा तालुक्यावर शिवसेनेचा भगवा फडकवा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या .यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील ,शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा .ज्योतीताई वाघमारे ,उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाचे कक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे ,करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचे सह करमाळ्यातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक ,मार्केट कमिटी व खरेदी विक्री संघाचे आजी-माजी संचालक व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते .उपमुख्यमंत्री शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आल्याने असताना माजी आमदार जयवंतराव जगताप ,जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे
यांच्यासोबत करमाळा नगरपालिकेतील माजी नगरसेवकांनी व अन्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली .जयवंतराव जगताप हे सध्या महाराष्ट्र राज्य बाजार  सहकारी संघाचे संचालक तसेच करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असून तालुक्यातील विविध सहकारी संस्थांवर त्यांचेअधिराज्य आहे .माजी आमदार जगताप प्रदीर्घ काळ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व काही काळ उपाध्यक्षपदी कार्यरत होते .माजी आमदार
कै . नामदेवराव जगताप यांना करमाळा तालुक्यात मानणारा मोठा मतदार असून निष्ठावंत कार्यकर्त्यांची एक मोठी फळी जगताप गटात कार्यरत आहे .जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप यांचे नेतृत्वाखाली रोज शेकडो पदाधिकारी शिवसेनेत सक्रिय होत आहेत .यावेळी बोलताना माजी आमदार जगताप म्हणाले की ,दिलेला शब्द पाळणे,सोडाची उद्देशाची राजकारण न करता जनहिताचे व विकास केंद्रित राजकारण करणे ही जगताप गटाची संस्कृती असूनकरमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेना मजबूत करणार असून येणाऱ्या सर्व निवडणुका धनुष्यबाणावर लढवल्या जाणार आहेत .
लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पन्नास हजार शिवसैनिकांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेणार असून या मेळाव्यातून निवडणुकीचे रणसिंग फुंकणार आहे .माजी आमदार जगताप यांचेसह सांगोल्याचे माजी आमदार शहाजी ( बापू )पाटील, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,
यांच्या सहकार्यातून व पुढाकारातून जिल्ह्यातील काही आमदार व मातब्बर पदाधिकारी लवकरच शिवसेनेसोबत येणार आहेत .
@@@##

करमाळा शहरातील विविध विकास कामासाठी 21 कोटी रुपयांच्या निधी मागणीचे पत्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी एकनाथ शिंदे यांना यावेळी दिले यावर उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रशासकीय मंजुरी देण्याचे आदेश दिले आहेत .
याशिवाय करमाळा शहरातील रखडलेल्या भुयारी गटार योजना,
अमृत टू नवीन पाणीपुरवठा योजना,
नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प ,रस्त्यांची कामे
या कामाचे प्रस्ताव तयार झाले असून त्याला सुद्धा मंजुरी देऊ असे आश्वासन दिले आहे
@@@
तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण (आबा )पाटील यांच्यासोबतच या पुढील सर्व निवडणुका लढविणे बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून ते याबाबतीत सकारात्मक असल्याचे यावेळी जयवंतराव जगताप यांनी सांगितले .

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

8 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

12 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

18 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

24 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago