Categories: करमाळा

नागराज मित्र मंडळाच्या वतीने नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी                                                 नागराज मित्र मंडळ नागराज चौक सुतारगल्ली करमाळा यांच्यावतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नागराज देवतेच्या  प्रतिमेचे पूजन करून अभिषेक करून साजरा करण्यात आला. पुरातन वारसा असलेले जागृत नागराज देवस्थान म्हणून प्रचलित असल्यानै करमाळा शहर व परिसरातील भाविक येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. नागराज देवाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या उत्सव साजरा करण्यासाठी नागराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते मनोभावे पूजा करून येणाऱ्या भाविक भक्तांचे स्वागत करून सेवा करतात. नागपंचमी उत्सव साजरा करण्यासाठी नागराज मित्रमंडळाचे अध्यक्ष दिपक झोळे, ज्येष्ठ भक्त गिरधरसिंह परदेशी शिवयोगी जंगम संदीप चुंग अभिमान लष्कर सत्यजित मडके मोहन सुरवसे खंडू पवार कृष्णा येळवणे आदींनी परिश्रम घेतले यावेळी मंडळाच्या या कार्याचे कौतुक डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी केले असून सालाबाद प्रमाणे मंडळांनी ज्येष्ठांचा वारसा यशस्वीपणे चालवुन आपल्या सण उत्सव भक्ती भावाने अशीच पंरपरा चालू  ठेवुनी नागराजाची सेवा करण्यासाठी कार्यरत रहावे असे आवाहन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.                                              

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

19 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago