Categories: करमाळा

शैक्षणिक महत्त्वाच्या कामांकरता जात पडताळणी कार्यालयाकडून कमी वेळेत पारदर्शीपणे जात पडताळणी प्रकरणाचा निपटारा करण्याची दिग्विजय बागल यांच्या मागणीवरून सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय शिरसाट यांचे आदेश

करमाळा (प्रतिनिधी)- शैक्षणिक कामांसह इतर महत्त्वाच्या कामांकरता जात पडताळणी सोलापूर कार्यालयाकडून कमीत कमी वेळेत व विनाविलंब गतिमान व पारदर्शीपणे जात पडताळणी प्रकरणाचा निपटारा करण्यात यावा अशा स्पष्ट सूचना व आदेश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाठ साहेब यांनी भ्रमणध्वनी वरून सोलापूर जात पडताळणी कार्यालयातील अधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती शिवसेना जिल्हा युवा नेते व मकाई कारखान्याचे माजी चेअरमन माननीय दिग्विजय बागल यांनी आज येथे दिली आज शिवसेना जिल्हा युवा नेते माननीय दिग्विजय बागल यांनी मुंबईत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट यांची मंत्रालयात भेट घेऊन सोलापूर जात पडताळणी कार्यालयाकडून जात पडताळणी बाबत होणाऱ्या विलंबा बाबत व सदर कार्यालयाचे कामकाज पारदर्शक गतिमान करणे बाबत पत्र दिले होते. यापूर्वी म्हणजे दोन दिवसा खाली शुक्रवारी माननीय दिग्विजय बागल यांनी त्यांच्याकडे आलेल्या जात पडताळणीसाठी अर्ज दिलेल्या अर्जदारांच्या असंख्य तक्रारी आल्या होत्या त्याबाबत माननीय दिग्विजय बागल यांनी थेट सोलापूर जात पडताळणी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांशी समक्ष भेटून चर्चा केली जात पडताळणीच्या त्रुटींबाबत अर्जदारांना ईमेल द्वारे कळवले जाते परंतु अर्जदारांना ईमेल वरील निरोप अथवा संदेश वेळेवर मिळत नाहीत कारण अनेक अर्जदारांनी आपले अर्ज खाजगी ऑनलाइन सेंटरवरून भरलेले असतात त्यामुळे अर्जदारांच्या त्यांच्या स्वतःच्या व्हाट्सअप नंबर वर जात पडताळणी कार्यालयाने ज्या काही त्रुटी अथवा कागदपत्रांची पूर्तता करणे बाबत कळवावे त्यामुळे वेळेचा अपव्यय टळेल अनेक प्रकरणी हेतू पुरस्सर सर्व कागदपत्रांची पूर्तता असूनही एक ते दीड वर्षापासून प्रलंबित आहेत सोलापूर जात पडताळणी कार्यालयात सध्या समितीच्या अध्यक्षा म्हणून एक अत्यंत कार्यक्षम व तत्पर महिला अधिकारी नियुक्त केले गेले आहेत परंतु कार्यालयातील इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे कडून सातत्याने जात पडताळणीची प्रकरणे विलंबनाने पूर्ण केली जातात कामातही पारदर्शीपणा व गतिमानता दिसत नाही विशेषतः कुणबी मराठा जात पडताळणीची अनेक प्रकरणे अनेक दिवसापासून कार्यालयात प्रलंबित आहेत यावर अर्जदारांना नेमक्या काय त्रुटी आहेत किंवा काम होणार आहे किंवा नाही याबाबत कळविले जात नाही या सर्व मुद्द्यांवर आज माननीय दिग्विजय बागल यांनी सदरची बाब मंत्री महोदय माननीय संजयजी शिरसाट साहेब यांच्या निदर्शनास प्रकर्षाने आणून दिली यावर तातडीने माननीय मंत्री संजयजी शिरसाठ साहेब यांनी सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयातील अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सक्त भाषेत सूचना दिल्या व अशा प्रकारचा विलंब खपवून घेतला जाणार नाही जात पडताळणीची कामे वेळेत पूर्ण करून त्याचा तातडीने निपटारा करावा अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती शेवटी दिग्विजय बागल यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

19 mins ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

6 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

23 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago