Categories: करमाळा

वीट आणि तालूक्याच्या उत्तर भागातील गावे सिंचनाखाली आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असुन नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे हेच प्रमुख ध्येय-आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी वीट आणि तालूक्याच्या उत्तर भागातील गावे सिंचनाखाली आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असुन नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे हेच प्रमुख ध्येय असल्याचे ठाम प्रतिपादन करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी केले. वीट येथील कार्यक्रमात ते बोलत होते. कुकडीचे पावसाळी आवर्तन सध्या चालू असुन वीट गावातील तलाव व‌ बंधारे भरले गेल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी पुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या वीस दिवसांपासून आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी दाखवलेल्या कार्यतत्परता व नियोजनामुळे कुकडीचे मुबलक पाणी सध्या तालूक्यात घेतले जात आहे. यामुळे वीट येथे पाणी पुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील‌ म्हणाले की वास्तविक पाहता करमाळा तालुक्यातील उत्तर भाग हा सिंचना पासुन‌ गेली कित्येक वर्षे वंचित आहे. या भागात मांगी तलावा सारखे मोठे पाणीसाठे उपलब्ध आहेत तसेच गावोगाव तलाव व बंधारे आहेत. परंतु साठवण करण्यासाठी पाणी नाही. कुकडीचे पाणी हे तालूका टेल मायनरला असल्याने पोहचताना अनेक अडचणी येतात. यामुळेच वैयक्तिक माझ्या संकल्पनेतून नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना आपण शासन दरबारी मांडली. सध्या सर्वेक्षण करण्यास मंजुरी मिळाली असुन हि योजना कायमस्वरूपी कार्यान्वित होण्यासाठी आपण प्रयतन करत आहोत. वीट आणि परिसरातील सिंचन, वीज, दळणवळण, ग्रामविकास व आरोग्य या प्रश्नावर आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत. जास्तीत जासत प्रश्न सुटुन या भागाचा सर्वांगीण विकास केला जावा यासाठीच आपण प्रयत्न करत असल्याचे आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी आवर्जून सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे, सुभाष जाधव, सुनील ढेरे, श्रीरंग जाधव, आदिनाथ संचालक देवानंद बागल,राजेद्रसिंह राजेभोसले,तात्यासाहेब जाधव,डिगांबर गाडे,बाळासाहेब गाडे,संतोष ढेरे,केशव चोपडे, डॉ ढेरे,अशोक राऊत,बिभिषन ढेरे, नवनाथ जाधव,हनुमंत ढेरे,बाबासाहेब ढेरे,रघुनाथ ढेरे,सतिष निबाळकर,धोडींबा जाधव,प्रकाश ढेरे,धनसिंग भोंग,कृष्णा ढेरे,गणेश ढेरे,गणेश जाधव,जगदिश निबाळकर, अंकुश जाधव,भाऊ गाडे,आण्णा जाधव,सुनिल टेलर,धनसिंग जाधव, भाऊ ढेरे, नवनाथ कोळी,अतिनाथ पवार,आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

1 hour ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

7 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago