करमाळा शहरामध्ये 20 ऑगस्ट 16 तर ग्रामीण भागात 13 कोरोना पाॅझिटिव्ह एकुण 29 कोरोना रुग्ण आजपर्यंत एकुण कोरोना रुग्णांची संख्या 403.

करमाळा प्रतिनिधी   करमाळा शहर व तालुक्यात 20ऑगस्ट रोजी 143 ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात तब्बल 29 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना आज करमाळा शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज करमाळा शहरात 51 ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल 16 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर ग्रामीण भागात 92 ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या असून यात 13 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये ग्रामीण भागातील जिंतीमध्ये पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे      पाच जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत 240 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. तालुक्यात आजपर्यंत 6 कोरोनाबाधीतांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या 154 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 403 आहे. करमाळा शहरातील 16 कोरोनाबाधीतांपैकी संभाजीनगर येथे 3, महिला, कृष्णाजीनगर येथे 1 पुरुष, 2 महिला, तेली गल्ली येथे 1पुरुष, राशीन पेठ येथे 2 पुरुष, 1 महिला, शिवाजीनगर येथे 1 पुरुष व मंगळावर पेठ येथे 3 पुरुष 1 महिलेचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात सावेडी येथे 2 महिला, तरटगाव येथे 1पुरुष, केम येथे 2पुरुष 5 महिला, जिंती येथे 2 पुरुष 1महिला यांचा समावेश आहे. या परिस्थितीत  नागरिकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन वीणा पवार यांनी केले आहे. 

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

5 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

6 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

12 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago