Categories: करमाळा

संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत स्कुल बॅग व वॉटर बॉटल चे वाटप…


करमाळा प्रतिनिधी
मा.आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात कंदर येथील पदम पंडित प्रतिष्ठानच्या वतीने अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक व माध्यमिक शाळा केम च्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व पाणी बॉटल चे वाटप आज मान्यवरांच्या हस्ते केम येथे करण्यात आले. यावेळी पद्म पंडित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक अभिमान गुटाळ, मंडळ अधिकारी मीरा नागटिळक, अजित दादा पवार माध्यमिक विद्यालय केम चे अध्यक्ष मारुती पारखे, विद्यमान सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विलास राऊत पाटील, प्रहार चे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, चेअरमन सुदर्शन तळेकर,केमचे उपसरपंच सागर कुरडे, ‌ ग्रामपंचायत सदस्य गोरख पारखे, करमाळा तालुका सावता माळी परिषदेचे अध्यक्ष दुधे, गणेश तळेकर ,कांतीलाल पवार ,वैजनाथ गुरव, मुख्याध्यापक नितीन जगताप, सहशिक्षक देविदास यादव यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब पवार यांनी केले तर विलासराव राऊत पाटील यांनी अध्यक्ष मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नितीन जगताप यांनी केले तर आभार काकासाहेब तळेकर यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

6 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago