करमाळा, प्रतिनिधी: महसूल सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली.या उपक्रमांतर्गत शुक्रवारी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत कुडुवाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात महसूल सप्ताहाचा प्रारंभ होणार आहे. शनिवारी शासकीय जागेवर २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमीत जागांचे पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी पाणंद व शिव रस्त्यांची मोजणी करून त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत. सोमवारी
सोमवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मंडलनिहाय राबविण्यात येणार आहे.
मंगळवारी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थीना घरभेटी करून डीबीटी अनुदानाचे वाटप करण्यात येईल. बुधवारशासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व ते अतिक्रमण मुक्त करून शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत सरकार धोरणानुसार निर्णय घेतला जाणार आहे. गुरुवारी एम. सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे व या कार्यक्रमाने महसूल सप्ताहाची सांगता होईल, असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, निवासी नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे हे परिश्रम घेत आहेत.
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…