करमाळा प्रतिनिधी पारधी समाजाला गुन्हेगारीपासून मुक्त करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पहाट प्रोग्राम कार्यक्रम असल्याचे मत करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी व्यक्त केले आहे.
सदर बैठकीसाठी 50 ते 60 पारधी समाजाचे पुरुष स्त्री मुले हजर होती त्यांना आम्ही गुन्हेगारी पासून परावृत्त होऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चोऱ्या अवैध दारू.. विक्री करू नये असे सांगून शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचे मार्गदर्शन केले आहे.
पंचायत समिती करमाळा येथील पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक श्री दिनेश काळे यांनी त्यांना शबरी आवास योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजना समजावून सांगून त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, अपंगाचा दाखला, रहिवासी दाखला, डोमीसाईल, सर्टिफिकेट,जागेचा उतारा, इत्यादी बाबत माहिती देऊन ती कागदपत्रे कशी काढायची याबाबत मार्गदर्शन केले आहे.समाज कल्याण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक श्री गोरख खंडागळे यांनी पारधी समाजासाठी असणाऱ्या सात योजना त्यामध्ये मागासवर्गीयशेळीपालन,,शिलाई मशी झेरॉक्स मशीन, अपंगासाठी शेळीपालन,पिठाची गिरणी, अपंगासाठी असणारी स्कुटी, इत्यादी बाबत मार्गदर्शन करून त्यासाठी मिळणारे अनुदानाबाबत व कागदपत्र बाबत माहिती दिली केंद्रप्रमुख श्री गोरे अंगणवाडीच्या उर्मिला गुंजाळ यांनी पारधी समाजाचे मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना शिक्षण घेणेबाबत सांगून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच शिक्षणासाठी शासनाकडून मिळणारे योजनांची माहिती दिली . पारधी समाजाची सामाजिक व आर्थिक सक्षमता वाढविणे त्यांचे शिक्षण यांचे आरोग्यसंपन्न होऊन उद्योगधंदे करण्यासाठी पुढे यावे ही संकल्पना आहे.जास्तीत जास्त पारधी समाजातील युवकानी शिक्षण घेऊन उद्योग व्यवसाय करावा व गुन्हेगारीतून मुक्त होऊन निकोप समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध रहावे असे आवाहन करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…