Categories: करमाळा

शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत‌ सरांचा राजीनामा मागे घेऊन ‌ पक्षांनी त्यांना ताकद द्यावी अन्यथा ‌ पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत-निखील चांदगुडे

करमाळा प्रतिनिधी                                                       शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत सरांनी पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रामाणिकपणे काम केले असून पक्षात असणाऱ्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे त्याची पक्षाने तात्काळ दखल घेऊन प्रा. शिवाजी सावंत सरांचा राजीनामा तात्काळ मागे घेऊन त्यांना पक्षाने मोठी ताकद द्यावी असे मत शिवसेना जिल्हा समन्वयक निखिल भैया चांदगुडे यांनी युवा सेना संपर्क कार्यालय करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला भटक्या विमुक्त जाती जमाती शिवसेना जिल्हा प्रमुख सुयश करचे युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत गोसावी, युवा सेना तालुका प्रमुख नवनाथ गुंड, युवा सेना शहर प्रमुख नागेश गुरव, युवा सेना शहर उपप्रमुख अनिकेत यादव, युवा सेना तालुका उपाध्यक्ष ज्योतीराम काळे, युवा सेना तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, शिवसेनेचे नेते धनंजय ढेरे शिवसेना उपतालुकाप्रमुख दादासाहेब थोरात उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना निखिल भैया‌ चांदगुडे म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख ‌ एकनाथ शिंदे ‌ यांच्या आदेशानुसार ‌ सोलापूर जिल्ह्यामध्ये ‌ प्रत्येक तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी ‌ प्रा. शिवाजी सावंत ‌ सर यांनी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून ‌ यशस्वीपणे काम केले आहे. पक्षीय राजकारणात ‌ त्यांनी ‌ शिवसेनेची ताकद ‌ वाढवण्यासाठी काम केले असल्याने आम्ही कार्यकर्ते त्यांच्या विचाराचे पाईक म्हणून काम करत आहोत. त्यामुळे अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्त व्यथीत झाले असून पक्षप्रमुख व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक शिवाजी सावंत यांची समजूत काढून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकांसाठी त्यांना ताकद द्यावी आम्ही कार्यकर्ते ‌ मनापासून दिलेल्या ‌ आदेशाचे पालन करून काम करणार आहोत.अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago