श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवार श्री खोलेश्वर महादेवाची रथामध्ये सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात येते. हा रथ पूर्ण सागवानी लाकडाचा असून अतिशय सुबक पणे त्याची रचना केली आहे. त्याच्यावरील नक्षीकाम श्री देवीचा माळ येथील कमलाभवानीदेवीच्या मंदिरा मधील दगडी रथ एक सारखे असल्याचे दिसून येते. या रथाची खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने मिरवणूक काढली जाते.
करमाळा शहरातील नागरिकांचे श्रद्धा स्थान असलेल्या या मंदिरातील नंदीची मिरवणूक माघ शुद्ध महिन्यातील महाशिवरात्री नंतर फाल्गुन शु. तृतीयाला काढण्यात येतो . तसेच लिंगायत कोष्टी समाजाच्या वतीने या ठिकाणी श्रावण महिन्यात शिवनाम सप्ताहाचे आयोजन परंपरेत नुसार अनेक वर्षा पासुन करण्यात येत आहे. हळद कुंकू अर्पण केल्यामुळे मूर्तीची झीज झाली होती त्यामुळे आरती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पिंडी सारखं चांदीचा मुकुट बसविलेला आहे. तसेच श्री देवीचा माळ येथील विष्णु मूर्ती वेशीतील महादेवाची पिंड व किल्ल्यातील श्री गणेश मूर्ती या येकच दगडाच्या बनविण्यात आले आहे असे सांगण्यात येते. बांधकामाची रचना मंदिरातील खांब हे श्री देवीचा माळ येथील मंदिर रचणे प्रमाणे दिसून येते या वेशीमध्ये महादेवाबरोबरच ब्रह्मा विष्णु अशी वेगवेगळी मंदिर आहे गेल्या पंधरा वर्षांपासून शहरात काही तरुणांनी खोलेश्वर मंदिराचे पुजारी नागेश गुरव यांच्यासह मिळून श्री खोलेश्वर आरती मंडळाची स्थापना केली आहे. लोकसहभागातुन शहरातील लोकांच्या वर्गणीतुन मंदीराचे कार्यक्रम संप्पन होत आहेत. यामधील अनेक युवक धार्मिक कार्यक्रमासाठी योगदान देतात. दैनंदिनी आरती वेळी भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…