Categories: करमाळा

करमाळा शहरात 20 ग्रामीण भागात 118 शिवसेनेच्या मजबूत शाखा उघडणार येणाऱ्या सर्व निवडणुका धनुष्यबाणावर लढवणार- माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी

राज्यातील सर्व महिलांचा लाडका भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचा विकास करणारी आहे.करमाळा तालुक्यातील जनतेच्या घराघरापर्यंत विकासाची गंगा आणण्यासाठी एकनाथ शिंदे हे एकमेव नेतृत्व सध्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन मी शिवसेनेत प्रवेश केला असून येणाऱ्या काळात गाव तिथे शाखा घर तेथे शिवसैनिक मोहीम राबून तालुक्यातील शिवसेना मजबूत करणार असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.तुळशी वृंदावन येथील शिवसेना शाखेचे उद्घघाटन धर्मवीर आनंद दिघे वाचनालय उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या आधुनिक सिद्धार्थ व्यायाम शाळेचे उद्घघाटनतसेच भव्य आकर्षक सहा फुटी विठ्ठल मूर्तीचे लोक लोकार्पण सोहळा कार्यक्रम झाल्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी शिवसेना युवा नेते नगराध्यक्ष वैभव राजे जगताप शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे
तालुकाप्रमुख अनिल पाटील,शहर प्रमुख संजय अप्पा
शीलवंत,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष संतोष वारगड ,ओबीसी तालुकाध्यक्ष अंकुशराव जाधव आरपीआय नेत्या नीलाताई कांबळे
युवा सेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे,उप तालुका प्रमुख डॉक्टर गौतम रोडे,बाळासाहेब वाघ,जे जे युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे
माजी नगराध्यक्षा पुष्पाताई फंड,शिवसेना पिंपळवाडी शाखाप्रमुख विश्वास काळे हनुमंत आप्पा फंड अमोल परदेशी प्रवीण कुटे निलेश कांबळे रघुनाथ क्षिरसागर ॲड नवनाथ राखुंडे,आदी पदाधिकारी यांचे सह नगरपालिकेचे अधिकारी आकाश वाघमारे शशांक भोसले उपस्थित होते .यावेळी बोलताना माजी आमदार जगताप म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विश्वासू कार्यकर्ता म्हणून करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे काम करत आहे.जिल्ह्यात माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,माजी आमदार शहाजी बापू पाटील व मी
शिवसेनेत सक्रिय झालो आहे,यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की माजी आमदार जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तालुक्यातील शिवसेना मजबूत झाली असून दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून माजी आमदार जगताप यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे करमाळा तालुक्यातील येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवणार असून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच प्रत्येक गावात शिवसेना मजबूत करून शाखा उद्घघाटनाची तयारी करावी.करमाळा तालुक्यातून 25000 शिवसेना सभासद नोंदणी महिनाभरात करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करणार असल्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शेवटी सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन अब्दुले यांनी केले .आभार मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी मानले .

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर वाढदिवस विशेष लेख – श्रीकांत साखरे

आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…

4 hours ago

शासकीय दाखले देण्यासाठी प्रत्येक विद्यालयात कॅम्प घ्या – गणेश चिवटे यांची मागणी

  करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…

13 hours ago

करमाळा तालुक्यात मतदार यादी अचूक करण्यासाठी SIR मॅपिंग मोहिमेला वेग; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन

करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…

23 hours ago

करमाळ्यात 15 ते 21 मे दरम्यान स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन – श्रेणिकशेठ खाटेर*

* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…

2 days ago

खासगी शाळेच्या संदर्भात चुकीची अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – जिल्हा अध्यक्ष संभाजी घाडगे

सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…

2 days ago

नामसाधना मॉडर्न स्कूलमध्ये ‘हॉर्स रायडिंग’चा दिमाखात शुभारंभ; जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांसह प्रवेश प्रक्रिया सुरू!

​ ​करमाळा प्रतिनिधी  शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…

3 days ago