Categories: Uncategorized

करमाळ्यात तालुका मानवाधिकार संरक्षण समिती स्थापन – गावागावात उभारणार संघटना

करमाळा प्रतिनिधी: देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे उलटली, तरीही अनेक ग्रामीण भागात 50 टक्क्यांहून अधिक लोकांना दडपशाही, अन्याय, आणि पारतंत्र्यात जीवन जगावं लागत आहे. आपल्या समस्या शासनाच्या दारापर्यंत मांडताना अनेकांना अडथळे, दबाव, आणि त्रास सहन करावा लागतो. हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांना मदत करणारी, मार्गदर्शन करणारी आणि न्याय मिळवून देणारी संघटना उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात तालुका मानवाधिकार संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली असून, ती राजकारणविरहित राहील आणि अन्यायग्रस्तांच्या बाजूने ठाम उभी राहील.

नगररोडवरील “संदेश कृषी पर्यटन केंद्र” येथे सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत गाव पातळीपासून तालुका पातळीवर सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या समस्या, त्या सोडवण्यासाठी आवश्यक यंत्रणा, तसेच लोकशाहीत मानवी हक्कांचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी समितीने महत्त्वाची उद्दिष्टे ठरवली आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोग व महाराष्ट्र मानवाधिकार आयोग यांच्या मार्गदर्शनानुसार हे कार्य राहणार ., अन्यायग्रस्तांना शासन दरबारी न्याय मिळवून देणे.,
आर्थिक, सामाजिक, व कायदेशीर अडचणीत असलेल्या व्यक्तींना सल्ला व मदत उपलब्ध करून देणे.,
प्रत्येक गावात समिती उभारून हक्कांसाठी सजग नागरिकांचा गट तयार करणे.,राजकारणविरहित, शुद्ध वैचारिक पातळीवर संघर्ष उभा करणेचे ठरले आहे.

यावेळी तालुकापातळीवर समिती स्थापन करण्याचा व भोसे येथे 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत ग्राम मानवाधिकार संरक्षण समिती स्थापन करण्याचा ठराव करण्याचे ठरले आहे. ज्यांना तालुक्यात राजकारणविरहित या समितीमध्ये काम करायचे त्यांनी ॲड. हिरडे-9011355389, गजेंद्र पोळ-9960471266,अनिल माने-9881264373 यांच्यांशी संपर्क करावा असेही ठरले आहे.

चौकटीत

“अन्याय सहन करायचा नाही, आणि अन्याय करणाऱ्याला मोकाट सोडायचे नाही.लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे, तर प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. हा हक्क मिळवण्यासाठी तालुकापातळीवर डॉ. ॲड.बाबूराव हिरडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका मानवाधिकार संरक्षण समिती स्थापन करत आहोत.त्याबरोबरच प्रत्येक गावात अशी समिती स्थापन करून हे काम केले जाईल.
प्रमोद झिंजाडे ,अध्यक्ष-महात्मा फुले समाज मंडळ, पोथरे.
चौकट पूर्ण

या बैठकीला प्रमोद झिंजाडे ,डॉ.ॲड. बाबूराव हिरडे ,जेष्ठ कवी प्रकाश लावंड, निवृत्त मुख्याध्यापक व भोसे सरपंच प्रतिनिधी निवृत्ती सुरवसे,पत्रकार गजेंद्र पोळ, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर,मेजर बबन नलावडे, निवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब झिंजाडे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तकिक, मोरेश्वर अण्णा पवार, नितीन तकिक, ॲड. बिभीषण सोरटे,अंगद देवकते,महादेव झिंजाडे, हनुमंत वारे (उपसरपंच भोसे), ॲड. प्रियाल अग्रवाल, अंधश्रद्धा निर्मूलनचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल माने, मार्गदर्शक रामचंद्र बोधे गुरूजी, तसेच डी.के. पासंगराव,नानासाहेब साळुंके,बाळासाहेब दुधे, कवी खलील शेख, इब्राहिम शेख, संतोष कांबळे, ग्राहक पंचायतचे संजय हांडे ,भावेश देवी,योगेश गिरमकर, यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago