Categories: करमाळा

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह ५ जणांची निवडणुकीत पैसे वाटल्याच्या आरोपातून ११ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता


करमाळा प्रतिनिधी
करमाळा माढा विधानसभेच्या निवडणूक प्रचारा दरम्यान २०१४ साली मौजे भाळवणी शिवारातील गावडे यांचे साई धाब्याच्या समोर सहा इसम संजय मामा शिंदे यांचे प्रचार साहित्य मतदार याद्या व त्यांचे मुखवटे घेऊन मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग करून मतदारांना पैशाचे आमिष दाखवून पैसे वाटताना त्यावेळी गस्तीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल कुमार गोडसे व पोलीस हवालदार मुजावर यांना आढळून आले. सदर इसमांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील तवेरा गाडी व दोन मोटरसायकली तसेच निवडणूक प्रचार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. सदरचा प्रकार हा संजयमामा शिंदे यांच्या सांगण्यावरून करत असले बाबत पोलिसांनी फिर्यादीत नमूद करून मा. आमदार संजयमामा शिंदे यांचा देखील सदर गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास हा ए.पी.आय ए. एस. माने यांनी करून सर्व आरोपीविरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी माननीय दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. पी. कुलकर्णी यांच्यासमोर झाली. सदर सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. दरम्यान आरोपीचे वकील एड. प्रमोद जाधव यांनी माननीय न्यायालयापुढे सदर आरोपींना गैरमार्गाने व राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुंतविलेले आहे. सदर घटनेशी यातील कोणत्याही आरोपीचा संबंध नाही. यातील संजयमामा शिंदे हे सदरवेळी करमाळा माढा विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहिलेले होते. केवळ त्यांची राजकीय बदनामी करून त्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रस्तुतचा खोटा गुन्हा दाखल केले बाबत न्यायालयात कथन केलेले होते.
सदर प्रकरणी सरकारी पक्षाला आरोपीविरुद्धचा खटला संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध करता आला नाही. त्यामुळे सदर आरोपींना संशयाचा फायदा देऊन मा.न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एड. सचिन लुनावत यांनी तर आरोपी पक्षातर्फे एड. प्रमोद जाधव व एड. सुनील रोकडे यांनी कामकाज पाहिले‌ सदर निकालानंतर करमाळा तालुक्यातील संजयमामा शिंदे गटाच्या कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

18 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

21 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago