Categories: करमाळा

करमाळा शहरातील जागृत देवस्थान खोलेश्वर महादेवाची तिसऱ्या सोमवारी निघणाऱ्या मिरवणूक रथाची माजी आमदार संजयमामा शिंदे हस्ते पुजा संप्पन*

करमाळा प्रतिनिधी पवित्र श्रावण मासानिम्मित करमाळा शहरातील किल्ला वेस येथील राजेरावरंभा काळातील खोलेश्वर महादेवाची रथ यात्रा मिरवणूक श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी करमाळा शहराच्या प्रमुख मार्गावरून जात असुन करमाळा शहरातील जागृत देवस्थान म्हणून पेशवे कालीन असलेल्या ‌ महादेव खोलेश्वर ‌ रथाची ‌ मिरवणूक दरवर्षी सालाबादप्रमाणे तिसऱ्या सोमवारी निघत असून ‌ खोलेश्वर महादेव ‌ रथाच्या ‌मिरवणुकीची ‌ पूजा ‌ माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे युवा नेते अमोलसिंह परदेशी यावेळी खोलेश्वर महादेव मंदिराचे पुजारी नागेश गुरव , रथाचे मानकरी गणेश झोळे, रथ ओढण्याचे मानकरी सुखदेव लष्कर,सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, नगरसेविका सो संगीताताई खाटेर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील व खोलेश्वर मंडळाची सर्व सदस्य व महादेव भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.करमाळा शहरातील जागृत देवस्थान म्हणून पेशवे कालीन असलेल्या ‌ महादेव खोलेश्वर ‌ रथाची ‌ मिरवणूक दरवर्षी सालाबादप्रमाणे तिसऱ्या सोमवारी निघण्याची पंरपरा कायम चालू आहे. खोलेश्वर मंडळाची सर्व सदस्य व महादेव भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सदर महादेव खोलेश्वर रथाची मिरवणूक महादेव मंदिर किल्ला वेस येथून निघणार असून मिरवणुकीचा मार्ग किल्ला वेस, फुलसौंदर चौक, जय महाराष्ट्र चौक, गुजर गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दत्त पेठ, सुभाष चौक, राशीन पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ते किल्ला वेस महादेव मंदिर किल्ला वेस या मार्गे असते करमाळा शहर तालुक्यातील भक्त मंडळी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी होतात.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

4 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago