Categories: करमाळा

सुरताल संगीत विद्यालयाच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन गीत गायन स्पर्धेचा निकाल जाहीर..


करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालय करमाळा च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन भक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातून तथा राज्यातून ५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने इयत्ता पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यां साठी ही स्पर्धा घेतली होती. विजेत्या स्पर्धका साठी ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात येणार आहे. प्रथम – ३००१, द्वितीय -२००१, तृतीय- १००१ ,आणि उत्तेजनात रु.५०० याप्रमाणे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे लागला आहे.
प्रथम – श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जि. धाराशिव,
द्वितीय क्रमांक- कु. स्नेहा गोविंद मुरकुटे लातूर तृतीय क्रमांक- कु. तनुश्री मुकिंदा हांडे सोलापूर, उत्तेजनार्थ – कुमारी वानेश्री अमोल घाडगे करमाळा, कु.शाल्मली हनुमंत फाटक बारामती, कु. मैत्रयी अनिकेत कुलकर्णी बीड . या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉक्टर जयभीम शिंदे परंडा, प्राध्यापिका वृंदा कुलकर्णी आंबेजोगाई, गायिका पूजा कोहळे वाई इत्यादी नी काम पाहिले. या मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे सुरताल संगीत विद्यालयाचे सर्वेसर्वा प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी अभिनंदन केले आहे. विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी तीन वाजता होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सवांमध्ये मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे खजिनदार श्री संतोष पोतदार गुरुजी यांनी दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago