यात हकीकत अशी कि 2 ॲागस्ट फिर्यादी नामे रतनबाई किसन गायकवाड वय ७० वर्षे रा. वाशिंबे ता. करमाळा जि. सोलापुर त्या संध्याकाळी ०८.०० वा. सुमारास घरामध्ये झोपल्या असताना घराचा दरवाजा कोणीतरी उघडल्याचा आवाज आल्याने त्या जाग्या झाल्या, त्यावेळी त्यांना त्यांचा मुलगा दुर्योधन आला आहे, असे वाटले. परंतु मुलगा नसून कोणीतरी दोन अनोळखी इसम घरामध्ये घुसले त्यापैकी एकाने त्यांना त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व कानातील झुबे काढून दे असे म्हणाले असता त्यावेळी त्यांनी त्यांना तुम्ही कोण आहे व तुम्ही माझे घरामध्ये का आले असे विचारले असता त्यावेळी त्या दोन इसमांपैकी एका इसमाने त्यांना हाताने तोंडावर, खांदयावर तसेच पाठीवर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे गळयामधील सोन्याचे आर्ध्या तोळयाचे बोरमाळ सदर इसमाने काढुन घेतली तसेच त्यावेळी दुस-या इसमाने त्यांच्या डाव्या कानातील सोन्याचे झुबे ओढून काढुन घेतले त्यावेळी त्या आरडाओरड करु लागल्या त्यावेळी घरामध्ये आलेले दोन इसम दरवाजा मधून पळून गेले. नंतर त्यांच्या शेजारील लोकांनी त्यांचा मुलगा दुर्योधन गायकवाड यांना फोन करुन बोलावून घेतले घडले घटनेबाबत सांगितले व दिनांक ०३/०८/२०२५ रोजी पोलीस ठाणेस हजर राहून माझे कोणत्यातरी दोन अज्ञात इसमांनी मला मारहाण करून माझे सोन्याचे दागिने माझे संमती वाचुन चोरून आहे. अशा आशयाची हकिकत सांगुन करमाळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं ६४०/२०२५ भारतीय न्यांय संहिता कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक रणजित माने यांना सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती मिळाल्याने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या व बीट अंमलदारांना योग्य त्या सुचना देऊन गुन्हे तपासाच्या अनुषांगाने तपास करण्यासाठी पथक तयार करून हद्दीत रवाना केले. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने सदर पथकानी तात्काळ योग्य असा सापळा लावुन त्या आरोपीस पकडले. त्यावेळी त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांनी माझे नाव १) धनाजी अनिल लोखंडे वय-२७ रा. वाशिंबे ता. करमाळा जि. सोलापुर २) तुषार सचिन भोंग वय २५ रा. वाशिंबे ता. करमाळा जि. सोलापुर असल्याचे सांगितले त्यावेळी त्याचे ताब्यातुन आर्धा तोळयाची सोन्याची बोरमाळ व कानातील झुबे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोसई / संदिप बनकर हे करत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना किष्णा व्ही.एस.यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, पोसई संदिप बनकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ अजित उबाळे, पोना/ मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोकों मिलिंद दहिहांडे, पोकॉ रविराज गटकुळ, पोकों अमोल रंदिल, पोकों योगेश येवले,, पोकॉ गणेश खोटे, पोकों हणुमंत भराटे पोकों अर्जुन गोसावी, पो काॅ. अमोल बागल यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…